Join us

Onion Cultivation : आता यंत्राद्वारे कांदा लागवड; मजुरी, लागवड खर्च होणार कमी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:58 PM

Onion Cultivation : शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब होत असल्याने थेट मशीनने कांदा लागवड करण्याचे प्रयोग सुरू आहेत.

Onion Cultivation : शेतकरी वर्गाला दिवसेंदिवस मजुरांची कमतरता भासू लागल्यामुळे व शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब होत असल्याने थेट मशीनने कांदा लागवड (Kanda Lagvad) करण्याचे प्रयोग सुरू आहेत. सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कांदा लागवड मशीनने कांदा लागवड पीक प्रात्यक्षिक नुकतेच राबविण्यात आले. या मशीनने मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत होणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. कांदा लागवडीला (Onion Sowing) प्रारंभ झाला असून मजुरांच्या माध्यमातून लागवड केली जाते. मात्र अधिक हेक्टरवर कांदा लागवड असल्याने अनेकदा मजुरीचा खर्च, वेळही जातो. त्यामुळे आता मशीनच्या माध्यमातून कांदा लागवडीवर भर दिला जात आहे. सिन्नर तालुक्यात प्रयोग करण्यात आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविले. शिवाय उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. 

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रघुनाथ आव्हाड यांच्या शेतात कांदा लागवड करण्यात आली. यावेळी शेतमाल कंपनीचे संचालक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थित होते. कांदा लागवडीसाठी या यंत्राचा उपयोग करून मजुरी व लागवड खर्च कमी करता येतो. शेतकऱ्यांनी आपल्या पैशांची, वेळेची बचत करण्यासाठी एकदा तरी या मशिनरीने कांदा लागवड करावी, असे आवाहन केदार यांनी केले. या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सोपे होणार असून मजुरांच्या समस्येवर हा प्रभावी उपाय असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा लागवडीला सुरवात 

कांदा लागवडीला सुरवात झाली असून नाशिकच्या येवला, लासलगाव, निफाड, सिन्नर, पिंपळगाव बसवंत, सटाणा आदी भागात लगबग सुरु आहे. पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीला वेग आला आहे. अशातच अनेक ठिकाणी मशीनचा वापर करून लागवड केली जात आहे. जास्त क्षेत्रावर लागवड करावयांची असल्यास मशीनचा अधिक उपयोग होणार आहे. 

 

टॅग्स :कांदानाशिकशेती क्षेत्रशेती