Kharif Sowing : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यावर्षी खरीप हंगामातील (Kharif Season) 8 जुलै 2024 पर्यंतच्या खरीप पिकांखालील क्षेत्रांमध्ये झालेल्या वाढीची माहिती जारी केली आहे. यानुसार खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राने 378 लाख हेक्टरचा टप्पा पार केला आहे. तर यंदा खरीप पिकांच्या (Kharif Sowing) पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.10 टक्के इतकी वाढ झाली असून कडधान्ये लागवडीखालच्या क्षेत्रात 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे चित्र आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने (Agriculture Department) दिलेल्या आकडेवारीनुसार भात 59.99 लाख हेक्टर, कडधान्ये 36.81 लाख हेक्टर, उडीद 5.37 लाख हेक्टर, मुंगडाळ 8.49 लाख हेक्टर, कुळीद 0.08 लाख हेक्टर, भरडधान्ये 58.48 लाख हेक्टर, ज्वारी 3.66 लाख हेक्टर, बाजरी 11.41 लाख हेक्टर, नागली 1.02 लाख हेक्टर, मका, 41.09, तेलबिया 80.31, भुईमूग 17.85 लाख हेक्टर, सोयाबीन 60.63 लाख हेक्टर, तीळ 1.04 लाख हेक्टर, सूर्यफूल 0.46 लाख हेक्टर, एरंडी 0.10 लाख हेक्टर, ऊस 56.88 लाख हेक्टर, कापूस 80.63 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
दरम्यान यंदा आतापर्यंत जवळपास 03 लाख 78 हजार खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मागील वर्षी त्या दिवसापर्यंत 03 लाख 31 हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झालेली होती. मात्र राज्याचा विचार केला असता अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही काही भागात पेरण्या पूर्णपणे झालेले आहेत. मात्र काही भागात दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर येऊन ठेपले आहे.
अनेक भागात पेरण्या संकटात
सद्यस्थितीत अनेक भागात पावसाने असून अनेक भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागातील लागवड पावसामुळे खोळंबली आहे. एकूणच कृषी आणि शेतकरी विभागाने एकूण खरीप पिकांची पेरणी अहवाल जारी केला आहे. त्यानुसार अनेक भागातील पेरण्या आटोपत आल्याचे चित्र आहे. मात्र अनेक शेतकरी अजूनही आस लावून असून पाऊस कधी येईल याकडे लक्ष देऊन आहेत.