Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season : खरीप हंगामात कुठल्या पिकाला किती खत द्यावं, जाणून घ्या सविस्तर 

Kharif Season : खरीप हंगामात कुठल्या पिकाला किती खत द्यावं, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Know in detail how much fertilizer should be given to which crop in Kharif season  | Kharif Season : खरीप हंगामात कुठल्या पिकाला किती खत द्यावं, जाणून घ्या सविस्तर 

Kharif Season : खरीप हंगामात कुठल्या पिकाला किती खत द्यावं, जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा.

Crop Management : शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा.

शेअर :

Join us
Join usNext

Kharif Season : जसे डॉक्टर रुग्णाला योग्य वेळी, योग्य प्रमाणात गोळ्या औषधे घेण्यासाठी सांगत असतात, जेणेकरून रुग्ण बरा आणि सुदृढ होईल. त्याचप्रमाणे खरीप पिकांसाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी रासायनिक खताची (Fertilizer) मात्रा देणं आवश्यक असते. शेतकरी बांधवानी आपण घेतलेल्या खरिप पिकांसाठी (Kharif Crop) रासायनिक खतांचा संतुलित (योग्य प्रमाणात) वापर करावा. कुठल्या पिकासाठी किती खत दिले पाहिजे, हे समजून घेऊया.

बाजरी पिकासाठी शिफारस 

बाजरीच्या पिकासाठी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश अवश्यक असते. नत्राची जेवढी मात्रा सांगितली आहे, त्या दुप्पट युरिया वापरला पाहिजे. सहा पट सिंगल सुपर फॉस्फेट आणि पालाशच्या दीडपट म्युरो टॉप पोटॅश खत वापरले पाहिजे. याच्यापैकी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश पेरण्याची वेळ द्यायचे आणि राहिलेले 30 किलो पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यायचं. ६५ किलो युरिया, 190 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरो टॉप पोटॅश बाजरीच्या पिकाला आणि एक महिन्याने पुन्हा 65 किलो युरिया देणे. 

खरीप ज्वारीसाठी शिफारस 
१०० किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही शिफारस आहे. तर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश लागवडीची वेळ देणे. उर्वरित ५० किलो नत्र पुन्हा लागवडीनंतर 30 दिवसांनी देणे. तर लागवडीच्या वेळी साधारणपणे 110 किलो युरिया, 310 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं आणि 85 किलो म्युरो टॉप पोटॅश देणे. खरीप ज्वारीच्या लागवडीनंतर एक महिन्याने पुन्हा तुम्हाला 110 किलो युरिया देणे. 

मका पिकासाठी शिफारस 

मक्याच्या पिकाला तीन वेळा हा युरिया समान प्रमाणामध्ये विभागून द्यायचा आहे. यात 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश. त्याच्यापैकी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश लागवडीच्या वेळी देणे. तर 85 किलो युरिया, 380 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 70 किलो म्यूरो  टॉप पोटॅश तर 85 किलो युरिया 30 दिवसांनी द्यायचा आहे आणि तिसरा आता 45 दिवसांनी पुन्हा 85 किलो युरियाचा मक्याच्या पिकाला प्रति हेक्टरी द्यायचा आहे . 
 

Web Title: Latest News Know in detail how much fertilizer should be given to which crop in Kharif season 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.