Lokmat Agro >शेतशिवार > Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना पुढचा हफ्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना पुढचा हफ्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Latest News ladki bahin yojana payment installment schedule december after maharashtra vidhan sabha results 2024 see details | Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना पुढचा हफ्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना पुढचा हफ्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पुढचा हफ्ता कधी येणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) पुढचा हफ्ता कधी येणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजेनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पात्र महिलांना १५०० रुपयांची मदत दिली जात होती, यापुढे २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन सरकारकडून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. 

नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा (Vidhansabha Election Result) निकाल लागला असून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार आहे. सरकारने या निवडणुकांच्या काही दिवस आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) याचा लाभही झाला. शिवाय निवडणुकीत देखील याचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी याच सरकारने या योजनेंतर्गत महिलाना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. 

तत्पूर्वी या योजेनच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंतची मदत वितरित करण्यात आलेली आहे. आता घोषणा केल्याप्रमाणे पुढील काही दिवसांत सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो. याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपयांचे मानधन ते लागू केलं जाऊ शकतं. मात्र आता येणाऱ्या दिवसांत याबाबत निश्चित असा खुलासा होईल. 

डिसेंबर महिन्यात जमा होणार? 

एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अस सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून काही दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार आहे.  

Web Title: Latest News ladki bahin yojana payment installment schedule december after maharashtra vidhan sabha results 2024 see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.