Lokmat Agro >शेतशिवार > Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते? वाचा सविस्तर  

Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते? वाचा सविस्तर  

Latest News Land Documents these 7 proofs that prove ownership of land Read in detail   | Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते? वाचा सविस्तर  

Land Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते? वाचा सविस्तर  

Land Documents : जमिनीबाबत वाद झाल्यास तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.

Land Documents : जमिनीबाबत वाद झाल्यास तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते.

शेअर :

Join us
Join usNext

Land Documents : जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते. हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहूया. 

खरेदीखत 
जमीन खरेदी विक्रीच्या (Land Buying)  व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो आणि तो म्हणजे खरेदीखत. खरेदी खत म्हणजे जमिनीचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे, याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये असते. 

सातबारा उतारा 
जमिनीचा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे? त्याचा किती जमिनीवरती अधिकार आहे? हे नमूद केलेलं असतं. यावरून जमिनीचा खरा मालक कोण? त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते. आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा देखील उपलब्ध करून दिला आहे. 

खाते उतारा किंवा आठ अ 
एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे या सगळ्या गट क्रमांकमधील शेत जमिनीची जी माहिती आहे, ती माहिती एकत्रितपणे  खाते उताऱ्यावरती नोंदवलेली असते. आठ अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण-कोणत्या गटात आहे, त्याची माहिती तुम्हाला कळू शकते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठ अ हा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो. 

जमीन मोजणीचे नकाशे 
जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काहीही वाद उद्भवला तर जमिनीचे मोजणी केली जाते. यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्या जवळ असल्यास त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणं गरजेचं असते. एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावरती आहे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती या नकाशावर दिलेली असते. 

जमीन महसुलाच्या पावत्या 
दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यामार्फत दिली जाणारी पावती हा सुद्धा जमिनीचा मालकी हक्काबाबतचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो. 

जमिनी संबंधिचे पूर्वीचे खटले 
एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्र, निकाल पत्रक इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत. कारण याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी तुम्हाला करता येऊ शकतो. 

प्रॉपर्टी कार्ड 
बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्का विषयी जागरूक राहणं आवश्यक असतं. बिगर शेत जमिनीवरती मालमत्तेच्या हक्क विषयी माहिती सांगणारा सरकारी कागद प्रॉपर्टी कार्ड आणि ज्या पद्धतीने सातबारा उताऱ्यावरती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे, याची माहिती दिलेली असते. 

हेही वाचा ; Jamin Mojani : जमीन मोजणीच्या नव्या दराला स्थगिती जुन्या दरानेच होणार मोजणी

Web Title: Latest News Land Documents these 7 proofs that prove ownership of land Read in detail  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.