Join us

Fertilizers Stock : खतांची टंचाई नाही, मागील वर्षीचा 41हजार मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 3:37 PM

Fertilizers Stock : खत व बियाण्यांची टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

नाशिक : खरीप हंगामास (Kharif Season) जोमाने सुरुवात झाली असून, ७० टक्के क्षेत्रांवर पेरण्या उरकत आल्या आहेत. खत व बियाण्यांची टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने अधिक माहिती जाणून घेतली असता बियाणे व खतांचा (Fertilizers Stock) पुरेसा साठा असून, टंचाई नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात अनेक भागांत पेरणीयोग्यही पाऊस झाला नव्हता. त्यामुळे ४१ हजार १०० मेट्रिक टन खताचा साठा शिल्लक राहिला होता. परंतु हाच साठा यंदा शेतकऱ्यांना तारणार आहे. त्यामुळे वेळेवर व मागणीनुसार खत शेतकऱ्यांच्या हातात पडत आहे.

कृषी विभागाकडून (Agri Department) आतापर्यंत १८ कृषी दुकानांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यासाठी ७१ हजार ८०८ मेट्रिक टन युरिया खत मंजूर करण्यात आले होते. परंतु त्यातील ३० टक्केच युरिया खत  वापरात आले होते. बाकीचा साठा नीट सांभाळून ठेवला गेला. राहिलेला शिल्लक खतसाठा शासनाकडे परत न पाठविता बंफर स्टॉक म्हणून ठेवण्यात आला होता. तोच साठा यावर्षी कामास येत आहे. मागील वर्षाचे बियाणे मात्र संपले होते. शिल्लक खतसाठ्यापैकी १९ हजार मेट्रिक टन खतसाठा शेतकऱ्यांच्या हातात देण्यात आला आहे. 

६० टक्के खत शेतकऱ्यांच्या हातीजिल्ह्यासाठी दोन लाख ३६ हजार खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यातील ६० टक्के साठा २० जूनअखेर शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदादेखील युरियाचा बंफर स्टॉक आहे. ७,५०८ साठा युरियाचा, डीएपीचा ६७३ मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

मालेगावात वाढणार कापसाची लागवडयंदा मालेगाव तालुक्यात कापसाची लागवड वाढलेली असेल. त्या खालोखाल सटाण्या तालुक्यात लागवड असेल. एक लाख ५० हजार बिटी बियाणांचे पाकिटे मागविण्यात आले असून, एक लाख सात हजार पाकिटे २० जूनअखेर आले आहेत. मालेगावच्या शेजारील जळगाव, धुळे जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते.

बियाणे कमी असल्याच्या नावाने लूटजिल्ह्यातील काही भागांत बियाणे नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे घेण्याच्या उद्देशाने परत पाठविले जात असल्याची तक्रार आल्यावर भरारी पथकाने अशा सहा ते सात दुकानदारांची चौकशी केली. त्यातील दोन दुकानांवरील विक्री रोखण्यात आली.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रखतेपीक व्यवस्थापन