नाशिक : सोनगाव येथील शेतकरी सोमनाथ खालकर यांनी दोन महिन्यांपूर्वी वेलकम ३०३ या कंपनीचे फ्लॉवर रोपे (Cauliflower Seed) सायखेडा येथील रोपवाटिकेतून (Nursery विकत घेऊन लागवड केली होती; परंतु बियाणात दोष निघाल्याने संपूर्ण फ्लावरचा प्लॉट (Flower Plot) खराब निघाला. सर्व कंद लालसर झाले असून अनेक ठिकाणी कंद फुटलेले दिसून येतात. त्यामुळे खालकर यांचा जवळपास चार लाख रुपये तोटा झाला आहे.
सद्यस्थितीत भाजीपाल्याचे दर (Vegetable Market) वधारलेले असून फ्लॉवरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एक कंद जवळपास ३० रुपये दराने किरकोळ बाजारात विक्री केला जातो. या परिसरात पाऊस कमी असल्याने यंदा फ्लॉवरला चांगली मागणी राहील, असा अंदाज खालकर यांना असल्याने त्यांनी जवळपास १६ हजार ५०० इतकी रोपे विकत घेऊन एक एकर क्षेत्रात फ्लॉवर लागवड केली. जमिनीची मशागत करून लागवड केलेल्या रोपांना जवळपास दोन महिने त्यांनी सांभाळले. फ्लॉवर मोठे करण्यासाठी त्यांना जवळपास दीड लाख रुपये खर्च आला. मात्र कंद अचानक लालसर झाले तर अनेक ठिकाणी कंद फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.
मे महिन्यात पाण्याची पातळी खोलवर गेली असताना टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकून वेलकम ३०३ या फ्लॉवर पिकाची लागवड केली. जवळपास एक एकर क्षेत्रात फ्लावर लागवड केली फ्लावर काही दिवस बाकी असतानाच सगळे कंद लालसर झाले. जारभावाप्रमाणे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, अजूनही कृषी अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले नाही. कंपनीचे प्रतिनिधी दीपक पाटील म्हणाले की, सोनगाव येथील सोमनाथ खालकर यांचा फ्लॉवरचा प्लॉटला भेट दिली असता कंद लालसर रंगाचे झाले आहे. यासंदर्भात कंपनीला कळवले असून वरिष्ठ यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील.
चार लाख रुपयांचे नुकसान
या शेतकऱ्याने एक एकरावर १६ हजार ५०० रोपांची लागवड केली. त्यानंतर औषध फवारणी व इतर मेहनत घेत जवळपास दोन महिने पिकाचा सांभाळ केला. मात्र सद्यस्थितीत फ्लॉवरचा कंद अचानक लालसर लालसर होऊ लागला असून अनेक कंद फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला सुचेनासे झाले आहे. अशा स्थितीत कंपनीच्या कर्मचाऱ्याने प्लॉटची पाहणी केली असून याबाबत कंपनीचा खुलासा आला नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.