Mahatma Phule Jayanti: आज महात्मा जोतीराव फुले (Mahatma Jotirao Fule) यांची जयंती. महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांच्या आसूड' या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतीसाठी ब्रिटिश सरकारला अनेकदा सूचना केल्याचे दिसून येते. शिवाय शेतकरी व शेती यांची परखड चिकित्सा केली आहे.
जोतीरावांच्या मते शेतक-यांच्या (Shetkaryancha Asud) या अगतिकतेचे मूळ त्यांच्या अज्ञानात आहे. त्यामुळेच त्यांनी सुरवातीलाच ‘इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले’ असे नमूद केले आहे. याशिवाय जोतीरावांनी चांगल्या शेतीसाठी इंग्रजांना सूचना देखील केल्या होत्या, त्या कोणत्या या लेखातून पाहुयात...
महात्मा फुलेंचे कृषीविषयक विचार
- शेतमालाच्या करातून सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार आणि पेन्शन कमी करावेत.
- अज्ञान शेतकऱ्यांना शिक्षित आणि विद्वान करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- शेतकऱ्यांच्या मुलांसाठी परीक्षा घेऊन त्यांना पाटिलक्या द्याव्यात.
- शिक्षण सर्वांपर्यंत समान पद्धतीने पोहचवण्यासाठी शेतकरी वर्गातले शिक्षक नेमावेत. म्हणजे ते समाजातल्या सर्व वर्गांमध्ये मिसळतील.
- शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शेतकी आणि आरोग्य, व्यावहारिक विषयांचा समावेश करावा.बैलांचं कत्तलीपासून संरक्षण करावं, यासाठी कायदा करावा.
- तसंच शेतकऱ्यांना शेणखताचा मुबलक पुरवठा कसा होईल, याकडे लक्ष द्यावे.शेतं सुपिक होण्यासाठी नियोजन करून बंधारे बांधावेत.
- जेणेकरून डोंगरदऱ्यांमधून पाण्याने वाहून येणारं खत शेतात मुरून मग पुढे नदी-नाल्यांना जाऊन मिळतील.
- डोंगरदऱ्यांमधील भागात तळी, तलाव सोयीसोयीने बांधावीत. तसंच लहानमोठी धरणं बांधल्याने बागायती क्षेत्राचा फायदा होईल.
- सिंचन बागायती क्षेत्र वाढवण्यासोबतच पाणलोटाच्या बाजूने शेताच्या बांधांनी वरचेवर दुरुस्त्या कराव्यात.झऱ्यांसारखे पाण्याचे स्त्रोत दाखवणारे नकाशे तयार करावेत आणि असे स्रोत राखणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे द्यावीत.
- देशातून तसंच परदेशातून शेळ्या मेंढ्यांची उत्तम पैदास होईल अशी बेणी खरेदी करून आणावी, त्याचा शेत सुपिक होण्यासही फायदा होईल.
- दरवर्षी श्रावणात शेतकऱ्यांच्या चांगल्या कामांचं प्रदर्शन घेऊन बक्षिसं द्यावी.
- तीन वर्षं उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पदव्या द्याव्यात.
- नव्या पिढीतल्या शेतकऱ्यांना परदेशी शेतकीच्या शाळा पाहण्यासाठी न्यावं.
- सरकारी तिजोरीत शेतीच्या करातून कोट्यावधी रुपयांचा भरणाऱ्या शेतकऱ्यांचं शोषण थांबवावं.