Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : कादवाकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता उत्पादकांच्या खात्यात वर्ग, कारखान्याचे मिल रोल पुजन

Agriculture News : कादवाकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता उत्पादकांच्या खात्यात वर्ग, कारखान्याचे मिल रोल पुजन

Latest News Mill roll pujan for the 48th fall season of Kadwa Cooperative Sugar Factory nashik | Agriculture News : कादवाकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता उत्पादकांच्या खात्यात वर्ग, कारखान्याचे मिल रोल पुजन

Agriculture News : कादवाकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता उत्पादकांच्या खात्यात वर्ग, कारखान्याचे मिल रोल पुजन

Kadwa Sugar Factory : आज कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) 48 व्या गळीत हंगामासाठी मिल रोल पुजन झाले.

Kadwa Sugar Factory : आज कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) 48 व्या गळीत हंगामासाठी मिल रोल पुजन झाले.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : साखर उद्योग (Sugar Factory) विविध अडचणींना सामोरे जात असून कामगारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. या वापरातून कमी दिवसात जास्तीचे गाळप होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. आज कादवा कारखान्याचे मिल रोल पुजन शुभारंभ सपंन्न झाला. शिवाय ऊस बिलाचा दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. 

कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) 48 व्या गळीत हंगामासाठी यंत्र जोडणी, मिल रोलर पुजन संचालक मधुकर गटकळ यांचे शुभहस्ते व चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी ऊस हे एकमेव शाश्वत पीक आहे. त्यासाठी उसाची एफआरपी (Sugarcane FRP) वाढणे आवश्यक असून त्यासाठी उसाची एफआरपीच्या तुलनेत साखरेचे किमान विक्री दर (एमएसपी)  वाढणे गरजेचे आहे. मात्र त्यात वाढ होत नाही, त्यामुळे सर्वच कारखान्यांने आर्थिक संकटात असून एफआरपी देण्यात अडचणी येत आहे. त्यातच इथेनॉल निर्मिती बंधन, स्पिरीटचे घसरलेले दर यामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. 

दरम्यान सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कादवाची वाटचाल सुरू असून कादवाने ऊस बिलाचा दुसरा हप्ता रू.200 प्रती टन प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यात वर्ग केला आहे. उर्वरित एफआरपी लवकरच देण्याचा प्रयत्न आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी उधारीने कंपोस्ट खत वाटप सुरू आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी प्रास्ताविक प्र.कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मांडले. तर कामगार संचालक भगवान जाधव यांनी गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कामगार सर्वतोपरी प्रयत्न करतील असे सांगितले. 

ऊस बिला पोटी दुसरा हप्ता ऊस उत्पादकांचे खाती वर्ग
कादवा ने गेल्या गळीत हंगामातील ऊस  एफआरपी बिलापोटी पहिला हप्ता रू. 2500 अदा केला होता आता दुसरा हप्ता रू. 200 प्रमाणे असे एकूण रु 2700 प्रती टन प्रमाणे ऊस उत्पादकांचे बँक खाती वर्ग केली असून उर्वरित रक्कम लवकरच अदा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. ऊस लागवड वाढावी यासाठी ऊस विकासाच्या विविध योजना सुरू असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवा ला ऊस पुरवठा करण्याचे आवाहन कादवा व्यवस्थापनाने केले आहे.

Web Title: Latest News Mill roll pujan for the 48th fall season of Kadwa Cooperative Sugar Factory nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.