यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने तीन दिवशीय 'मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-२०२४' आयोजित करण्यात आला आहे. नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातील उदाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी १,२ व ३ मार्च दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा मिलेट वर्ष म्हणून साजरे केले जात असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मिलेटला प्राधान्य दिले जात आहे. मिलेट धान्यांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत.
महोत्सवात विशेष काय?
या महोत्सवामध्ये उत्पादकांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार करण्यात येणारा ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स आदी नाविण्यपूर्ण उत्पादने थेट उत्पादकांकडून प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच महोत्सवात मिलेट उत्पादने, मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांनी मिलेट खरेदीसह विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मिलेट महोत्सव कार्यक्रम वेळापत्रक
दिवस १ - शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४
मिलेट Rally सकाळी ९.०० ते ११.००
उद्घाटन समारोह - सकाळी ११.०० ते १.००
दिवस २ -शनिवार २ मार्च २०२४ – मिलेट कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम
मिलेट कार्यशाळा
सेशन १ – महाराष्ट्राचे पारंपारिक अन्न- मिलेट व त्याचे विविध प्रकार आणि मिलेट शेतीचे महत्व
सेशन २ – मधुमेहमुक्त व निरामय आरोग्यासाठी मिलेट सेवन व त्याचे आयुर्वेदिक महत्व
सेशन ३ – नाशिक जिल्ह्यातील नाचणी व वरई पिकविविधता व पोषणविशेष
दुपारी ३ ते ४.३० व संध्या ७.०० ते ८.०० – सांस्कृतिक कार्यक्रम (उडदावणे गावातील आदिवासींचे दमदार कांबड व फुगडी नृत्य)
दिवस ३ - रविवार ३ मार्च २०२४ – मिलेट – उद्योजक अनुभव कथन व आहारतज्ञ मार्गदर्शन
सेशन १– मिलेट प्रक्रिया उद्योग, संधी व बाजारपेठ
सेशन २ –मिलेट प्रक्रिया उद्योगात महिलांना संधी
सेशन ३ – मिलेटचे आहारातील महत्व, पोषण व जीवनशैली
दुपारी ४.०० ते ६.०० – समारोप व अनुभव कथन आणि प्रतिक्रिया
तसेच तीन दिवस प्रदर्शन व विक्री