Mushroom Training : अलीकडे अनेक शेतकरीशेतीत अभिनव प्रयोग करून नफा कमवत आहेत. त्यातलीच एक म्हणजे मशरूम शेती होय. अगदी कमी खर्चात, कमी जागेत चांगलं उत्पन्न देणारी शेती म्हणजे मशरूम शेतीकडे (Mushroom Farming) पाहिले जाते. म्हणूनच अनेक शेतकरी मशरूम शेतीला प्राधान्य देत आहेत. यात आदिवासी महिला शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक दिसून येत. आता या मशरूम शेतीचं प्रशिक्षण घ्यायचं ठरल्यास कुठे प्रशिक्षण मिळतं, हे या लेखातून पाहुयात...
मशरूम शेतीचे (Mushroom Training) प्रशिक्षण कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, काही कृषी महाविद्यालयातून देखील प्रशिक्षण दिले जाते. या लेखातून देशपातळीवर आयसीएआर (ICAR Directorate Of Mushroom Research) प्रशिक्षण कार्यक्रम घेत असते. त्या अंतर्गत मशरूम संशोधन संचालनालय हे मशरूम शेती संबंधी वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असते. त्यानुसार आता नोव्हेंबर ते पुढील 31 मार्च पर्यंतचे प्रशिक्षण कार्यक्रम पाहुयात.
- मशरूम शेती प्रशिक्षण : 02 ते 06 डिसेंबर 2024 या कालावधीत असणार आहे.
- उद्योजकांसाठी मशरूम उत्पादन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण : सहा ते 14 जानेवारी 2025
- लहान शेतकऱ्यांसाठी मशरूम प्रशिक्षण 10 ते 14 फेब्रुवारी 2025
- लहान उद्योजकांसाठी मशरूम उत्पादन प्रशिक्षण : 03 ते 11 मार्च 2025
अशा पद्धतीने चार प्रशिक्षण वर्ग पुढील मार्च महिन्यापर्यंत निश्चित निश्चित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणासंबंधीची सविस्तर माहितीसाठी https://dmrsolan.icar.gov.in/html/trainingcalender.html या संकेतस्थळावर भेट द्या. तसेच डॉ. वी.पी. शर्मा, निदेशक -लैंड लाइन: 01792-230451 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क करा.
हेही वाचा : Mushroom Farming : मशरूम शेतीनं आदिवासी महिलांचं जीवन कसं बदललं? वाचा सविस्तर