Join us

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पाचव्या हफ्त्यास मंजुरी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 7:51 PM

Namo Shetkari Yojana :

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजने (Namo Shetkari Yojana) अंतर्गत पाचवा हप्ता (माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी २२५४.९६ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा ५ ऑक्टोबर जमा झाल्यानंतर लागलीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा हफ्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.  

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु.६ हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.६ हजार इतक्या निधीची भर घालणारी "नमो शेतकरी महासन्मान निधी" ही योजना राबविण्यास सुरवात झाली.  

या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, तसेच, चौथा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. सन २०२४-२५ मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशिर्षा अंतर्गत मंजूर तरतूदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत पाचवा हप्ता (माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रू.२२५४.९६ कोटी इतका निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कृषी आयुक्तांवर जबाबदारी 

दरम्यान सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी शासन निर्णयात नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय /परिपत्रकांमधील तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील. योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक, लेखा-१, यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रकृषी योजनाशेती