Nashik Crop Damage : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला, बागलाण, देवळा, चांदवड आदी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतीला अक्षरश झोडपून काढले. यात मका भुईसपाट झाला तर कांदा रोप पूर्णता हातचे गेले असून लागवड झालेला कांदा पुरता सडला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे रब्बीचे नियोजन कोलमडले आहे.
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटाना तोंड देत असल्याने शेतकयांचे अर्थचक्र बिघडले आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर पिके चांगली येऊन चार पैसे हातात येतील, असे स्वप्न रंगवत असताना परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झटका दिला आहे. या वादळी पावसाने (Heavy rain) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मका, कपाशी, सोयाबीन ही पिके संकटात आली आहेत. सोयाबीन, मकाची सोंगणी, काढणी सुरू केली आहे. हे काढून झालेल्या व शेतातच जमिनीवर पडलेल्या मका पिकाच्या बीटीस पावरसमुळे मोड फुटण्याची शक्यता आहे.
कांद्याला फटका दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसामुळे लागवड आलेल्या लाल पोळ कांद्यासह (onion Crop) टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेत जमिनीतच सडू लागलेला लाल पोळ कांदा असो की दुसरीकडे पुढील रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकऱ्यांनी टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे अवकाळी पावसामुळे खराब झालेली आहे. त्यातून शेतकऱ्यांनी सध्या घेतलेल्या लाल पोळ कांद्याचे होणारे एकरी नुकसान, तसेच उन्हाळा कांद्यासाठीची रोपे कमी झाली आहेत. परिणामी लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पूढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे संकटात सापडली आहेत.
मका उत्पादक चिंतित एका बाजूला कांदा हे पीक अडचणीत आले असतानाच मका शेतीला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १२ हजार १९८ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदगाव, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी तालुक्यात मका सुरक्षित राहिला असून सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात ४७८० हेक्टर इतके झाले आहे. त्या खालोखाल देवळा २८०४, चांदवड २४९३ हेक्टरवरील मका जमीनदोस्त झाला आहे.
Crop Damage : डोळ्यांदेखत सगळंच वाहून गेलंय, कशाचा पंचनामा करणारं, शेतकऱ्यांचा सवाल