Nashik : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) इगतपुरी विभागीय संशोधन केंद्रावर भात लागवड (rice Cultivation) सुरु झाली आहे. यंदा एकूण लागवड क्षेत्र ११ हेक्टर असून त्यापैकी बिजोत्पादन क्षेत्र हे ९ हेक्टर तर प्रयोग क्षेत्र २ हेक्टरवर आहे. भात पिकाच्या नवीन वाण निर्मितीच्या दृष्टीने राज्यस्तरीय प्रयोग यामध्ये लवकर पक्वता गट, मध्यम पक्वता गट, उशिरा पक्वता गट, असे वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. तसेच संशोधन केंद्र स्तरावरील प्रयोग, इंद्रायणी वाण बीजोत्पादन, फुले सुपर पवना मूलभूत व पैदासकार बीजोत्पादन यांची लागवड सुरू आहे. इगतपुरीच्या विभागीय संशोधन भाताच्या नवनवीन वाणांचे संशोधन केले जाते. शिवाय भात लागवड देखील केली जाते. या संशोधन केंद्राची स्थापना/सुरुवात वर्ष १७ जून १९४१ रोजी झाली असून या केंद्राची उद्दिष्ट असे की, भात पिकाच्या बहुस्थानीय चाचण्या घेणे. भाताच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या, जास्त पाण्यात तग धरणाऱ्या लवकर येणाऱ्या (हळव्या), निम गरव्या, उशीरा येणारी (गरव्या), बारीक धान्य आणि खतांना प्रतिसाद देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी, भाताच्या सुधारित जातींचे बीज गुणन आदी.
अखिल भारतीय खुरासणी संशोधन प्रकल्प - ( AICRP) विभागीय कृषी संशोधन केंद्र
संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जाती: फुले कारळा व फुले वैतरणा त्यापैकी फुले कारळा हा खुरासणी पिकाचा वाण देशपातळीवरील विविध प्रयोगामध्ये तुल्यवाण म्हणून वापरला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत खुरासणी पिकाच्या विविध जनन द्रव्यांचे संकलन, देखभाल आणि मूल्यमापन केले जाते. कारळा पिकामध्ये जास्त तेल व बियांचे वाणांवर संशोधन केले जात आहे. त्यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे संकर घडून आणून त्यांचे पुढील पिढ्यांचे मूल्यमापन केले जाते.
यापद्धतीमधून जास्त तेल व बियांच्या उत्पादन देणाऱ्या वाणांचे स्थानिक, राज्यस्तरीय, बहु स्थानिक प्रयोग दरवर्षी घेतले जातात. तसेच संशोधन केंद्रावर नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी हवामान सतर्कता/ इशारा व हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवेचा फायदा होण्यासाठी कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, ग्रामीण कृषी मौसम सेवा कार्यरत आहे.