Join us

आता एका क्लिकवर दिसणार नकाशा आणि सातबारा, हद्दीबाबतचे वाद मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 7:50 PM

जमीनमालकाच्या सातबाऱ्याला संबंधित जागेचा नकाशा 'जीआयएस' प्रणालीद्वारे जोडला जाणार आहे

जळगाव : सातबाऱ्यासोबतच जमिनीचा नकाशाही डिजिटल मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भौगोलिक ठिकाणानुसार गट नंबर, सर्व्हे नंबरवरील जमिनीचे अक्षांश- रेखांशाच्या आधारे जमिनीचे ठिकाण सहज सांगता येणार आहे. यासोबतच जमीनमालकाच्या सातबाऱ्याला संबंधित जागेचा नकाशा 'जीआयएस' प्रणालीद्वारे जोडला जाणार आहे आणि त्यासोबत गावांच्या नकाशांचे भूसंदर्भीकरण करण्याचा ७७२ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात हा प्रयोग सध्या सुरू असून आता यात भुसावळचा देखील समावेश करण्यात आला आहे. भूमिअभिलेख विभागाने रोव्हर मशीनच्या साह्याने ई-मोजणी करण्यास सुरुवात केली, त्याआधारे जमिनीचा अक्षांश-रेखांश कळणे शक्य झाले आहे. तसेच ई नकाशा प्रकल्पांतर्गत भूमी अभिलेख विभागाने 36 जिल्ह्यातील नकाशाचे डीजीटायझेशन करण्याचे काम हाती घेतले असून सहा जिल्ह्यात काम पूर्ण झाले आहे.

काय फायदा होणार?

जिओ रेफरन्सिंगमुळे जमिनींचे अचूक अक्षांश रेखांश मिळणे शक्य होणार आहे. सातबारा, नकाशे एकत्रित दीर्घकाळ सहज मिळतील. नकाशासोबत जमिनीचे अक्षांश-रेखांश मिळणार आहेत. जमिनीच्या हद्दीबाबतचे वाद-विवाद यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

नकाशा-सातबारा एकत्र

जमिनीचे अक्षांश-रेखांश नकाशावर देण्याची प्रक्रिया भूमिअभिलेख विभागाकडून सध्या सुरू आहे. त्यासोबत एखाद्या भागातील सव्र्व्हे नंबर किंवा गट नंबरवरील जमिनीचा नकाशाला जमीनमालकाचा सातबारा जोडण्यात येणार आहे. जीआयएस प्रणालीद्वारे सातबारा आणि नकाशा एकमेकांशी जोडण्यात येणार आहे.

 पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीजळगावशेतकरीडिजिटलशेती क्षेत्र