Nuksan Bharpai : राज्यात झालेल्या खरीप हंगाम 2024 मध्ये (Kharif Season 2024) अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर (Unseasonal rain) नुकसान झालं होतं. अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास ३१७८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर (Nuksan Bharpai) झाली आहे. खरीप २०२४ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास ३१७८ कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी १६२० कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित १५५८ कोटी रुपये वाटप सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले.
यात नाशिक विभागात जवळपास 14 लाख 988 रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाले आहे. यातील 02 लाख 760 रुपये वाटप करण्यात आले असून 12 लाख 227 रुपये वाटप करण्याचे शिल्लक आहेत. दुसरीकडे पुणे विभागात 28 लाख 299 रुपये मंजूर झाले होते. यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे. पुणे विभागात अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी यावर क्लिक करून सविस्तर जिल्हा निहाय नुकसान भरपाईची आकडेवारी पाहू शकता.
तसेच कोल्हापूर विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील 02 लाख 57 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 12 लाख 81 हजार रुपयांची रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी 56 लाख 418 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी 11 लाख 846 रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आले असून 44 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा बाकी आहे.
लातूर विभागातून लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई 62 लाख रुपयांची मंजूर झाली असून एकूण नुकसान भरपाई ही 01 कोटी 33 लाख रुपयांची आहे. यापैकी 92 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून 40 लाख रुपयांचे वाटप अद्यापही शिल्लक आहे.
तसेच अमरावती विभागातून 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आहे. तर यापैकी 36 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 26 लाख रुपयांचा निधी लवकरच वाटप केला जाणार आहे. अमरावती विभागात बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो.
तर नागपूर विभागात 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यातील 17 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून केवळ दोन लाख रुपयांचे वाटप शिल्लक आहे. या विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.