Agriculture News : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापुर जि. हिंगोली मार्फत रोपवाटिका व्यवस्थापन या स्वयंरोजगाराभिमुख ०५ दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. रोपवाटिका व्यवस्थापन या प्रशिक्षणाअंतर्गत नेमकं काय काय शिकवलं जाईल, हे सविस्तर पाहुयात....
रोपवाटीका व्यवस्थापन पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हा २० ऑगस्ट २०२४ ते २४ ऑगस्ट २०२४ रोजी शेतकरी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कालावधीत पहिल्या दिवशी २० ऑगस्ट २०२४ रोपवाटीका व्यवस्थापन ओळख व रोपाची निवड आणि लावण्याची पध्दती, दुसऱ्या दिवशी २१ ऑगस्ट २०२४ मातीची निवडे पाणी व खत व्यवस्थापन आणि किड नियंत्रण, तिसऱ्या दिवशी २२ ऑगस्ट २०२४ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रोप वाटीकेचे आर्थीक फायदा, चौथ्या दिवशी २३ ऑगस्ट २०२४ रोपांची वाढ आणि विकासावर लक्ष ठेवणे व किटकनाशकांचा योग्य वापर, पाचव्या दिवशी २४ ऑगस्ट २०२४ फिल्ड व्हिजीट, प्रश्नउत्तर व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल.
हिंगोली जिल्ह्यात हळूहळू भाजीपाला लागवड वाढू लागली आहे. परिणामी शेतकऱ्यांना विविध भाजीपाला शेतीसाठी रोपांची आवश्यकता भासत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट रोपांची माहिती, तसेच कुठं जास्त पाऊस पडतो, तर कुठे कमी पडतो, अशा स्थितीत कुठल्या रोपांची निवड करणे शेतकऱ्यांना अडचणींचे ठरते. या गोष्टींचा विचार करून कृषि विज्ञान केंद्रामार्फत ग्रामीण युवकांसाठी रोपवाटिका व्यवस्थापन या कौशल्याधीष्ठीत ०५ दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.