Turmeric Farming : हळद म्हटली की पहिल्यांदा डोळ्यासमोर पिवळीधमक हळदीचा तुकडा आठवतो. आज देशातील कुठलंही घर घ्या, प्रत्येक घरात हळदीचा वापर सर्रास केलाच जातो. त्यामुळे हळदीला मोठी मागणी असते. त्यामुळे जे हळदीचे पीक आहे, ते सर्वाधिक कमाई करून देणारे पीक म्ह्णून ओळखले जाते. नेमका हळदीच्या उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं गणित समजून आहे.
मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्न या मूलभूत गरजेमध्ये हळद हा महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टीत हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे हळदीला मोठी मागणी असते. शिवाय महाराष्ट्रातील सातारा, सांगली, हिंगोली आदी भागात मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेतले जाते. परिणामी सततची मागणी असल्याने बाजारभावात तेजी पाहायला मिळते. त्यामुळेच हळद पिकाला कमाईचे पीक म्हणून ओळखले जाते. हळद हे पीक अनेक कारणांसाठी वापरले जात असल्याने वर्षभर या पिकाला मागणी असते. त्यामुळे पिकाला बाजारभाव सुद्धा मिळत असतो.
हळदीच्या पिकाला पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. त्यामुळे भरघोस उत्पादन घेता येते. शिवाय खरंच, वेळेची बचत, मजूर कमी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टींची बचत होते. साधारण ओल्या हळदीचे 100 क्विंटल आणि वाळलेल्या हळदीचे प्रति 30 क्विंटल उत्पादन एकरी निघत असल्याचे शेतकरी सांगतात. दुसरीकडे हळदीचा भाव चांगला शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो. त्यामुळे हळूहळू हळदी पीक घेण्याकडे कल वाढू लागला आहे. शिवाय भारतातच नव्हे तर अन्य देशांतही हळदीला मोठी मागणी असते. अनेकदा ऑनलाईन प्रकारात देखील ग्राहक हळदीची मागणी करत असतात. त्यामुळे सर्वच स्तरातून मागणी होत असल्याने जास्तीत जास्त उत्पन्न हळदीच्या पिकातून मिळत असते.
स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार
घरात स्वयंपाकापासून ते आयुर्वेदिक उपचार म्हणूनही हळदीचा उपयोग होतो. त्यामुळे बाजारात हळदीला मोठी मागणी असते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. तर देशातील अन्य राज्यांतही हळदीची शेती केली जाते. हळदीची शेती साधारण मार्च सुमारास सुरु केली जाते. या दरम्यान लागवड आदी कामे केली जातात.सद्यस्थितीत अनेक शेतकरी हळदीच्या शेती आधुनिक तंत्र वापरून करत आहेत. कमीत कमी खर्च करून अधिकचे उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने अनेक शेतकरी हळद शेतीला देखील प्राधान्य देशातील अनेक भागात शेतकरी देत आहेत.