Lokmat Agro >शेतशिवार > Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर?

Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर?

Latest News Onion cultivation is recorded on 70 thousand hectares in maharashtra see details | Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर?

Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर?

Onion Cultivation : जून-जुलै महिन्यात कांदा पेरणीवर भर दिल्याने खरीप हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.

Onion Cultivation : जून-जुलै महिन्यात कांदा पेरणीवर भर दिल्याने खरीप हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- अरुण बारसकर
सोलापूर :
नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) राज्यातील कांदा क्षेत्र असलेल्या इतर जिल्ह्यात कांदा लागवडीला (Onion cultivation) वेग आला आहे. यात लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून, त्यामध्ये सोलापूर २९ हजार हेक्टर, तर अहमदनगर जिल्ह्यात २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे.

मागील वर्षी खरीप, लेट खरीप व रबी हंगामात राज्यात ३० जिल्ह्यांत ६ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीची नोंद झाली होती. यंदा काही जिल्ह्यांचा अपवाद सोडला, तर राज्यात ४ जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून जुलै महिन्यात कांदा पेरणीवर भर दिल्याने खरीप हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले आहे.

पेरणीमुळे कांदा क्षेत्रात वाढ...
साधारण कांद्याचे बी टाकून रोप तयार करून कांदा लागवड केली जाते. मात्र, यंदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा पेरणीवर भर दिला आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे रोप तयार झाल्यानंतर लागवड केली जाते. तेव्हा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत कांदा लागवड क्षेत्र सोलापूरपेक्षा अधिक झाल्याचे दिसेल, असे कृषितज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

आठवड्यापर्यंतची आकडेवारी
पाहिली असता सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात २३ हजार ५०० हेक्टर, पूर्ण पुणे जिल्ह्यात स सहा हजार, बीड चार हजार सहाशे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २,३३७ हेक्टर, सातारा जिल्ह्यात अठराशे हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात एक हजार, तर धुळे जिल्ह्यात सहाशे हेक्टर कांदा लागवडीची नोंद आहे.

Web Title: Latest News Onion cultivation is recorded on 70 thousand hectares in maharashtra see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.