- योगेश बिडवई
नाशिक जिल्ह्याला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून दिली ती कांद्याने. नाशिक जिल्ह्यातील लासलगावचा कांदा हा जगामध्ये प्रसिद्ध असून, आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ ही लासलगावची ओळख आहे. कांद्याच्या उत्पादन आणि वितरणामध्ये, तसेच बाजारपेठेमध्येही महिलांचा मोठा वाटा आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता होत असते.
कांदा आणि महिला हा संबंध फक्त स्वयंपाकघरापुरताच मर्यादित आहे, अशी अनेकांची समजूत असेल; पण ते खरे नाही. कांद्याच्या पिकावर अनेक महिलांचे अर्थकारणही अवलंबून असते. कांद्याच्या पिकात राबणारे हातही महिलांचेच असतात. कांद्यातील विशिष्ट तिखटपणा, चवीमुळे भेळभत्यापासून वेगवेगळ्या भाज्या, सांबर यामध्ये भारतीय माणसाला कांदा हा लागतोच. ही झाली कांद्याची ढोबळ माहिती. मात्र, कांदा हे महिलांचे पीक म्हणून ओळखले जाते. त्याची लागवड, काढणी ही कामेच नव्हे, तर बाजारात आणण्यासाठी तो ट्रॅक्टर अथवा पोत्यात भरणे असो, त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर त्याची प्रतवारी करणे असो किंवा कांद्याच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या शिवण्याचे काम असो, यात महिलांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे कांद्याचे अर्थकारण बिघडले की महिलांनाही पैशांची चणचण भासते.
महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात तर या पिकामुळे महिलांना मोठा रोजगार मिळाला आहे. त्यामुळेच कांदा पिकावर महिलांचे अर्थकारण अवलंबून असते, असे म्हटले जाते. आशिया खंडात लासलगाव आणि पिंपळगाव बाजारपेठेचे नाव कांद्याच्या दरनिश्चितीत महत्त्वाचे आहे. देशात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापा-यांची पहिल्यापासून मक्तेदारी आहे. लासलगावला भाव ठरल्यानंतरच देशभरातील घाऊक बाजारात त्यानुसार दर ठरतात.
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मागील ५० वर्षात आशिया खंडातील एक मोठी बाजार समिती म्हणून पुढे आली आहे. त्यामुळे येथील दरही देशभरातील नव्हे, तर आशियातील कांद्याच्या दरावर परिणाम करणारे ठरतात लासलगावच्या कांद्याला भौगोलिक मानांकन लासलगावच्या कांद्याला एप्रिल २०१६ मध्ये भौगोलिक मानांकन (जी.आय) मिळाले, रंग, विशिष्ट वस्ती लासलगावया कांदा जगभरात ओळखला जातो लासलगावच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने त्याची चव दूरवर पोहोचण्यास मदत झाली आहे. लासलगावच्या बळीराजा फार्मर्स ग्रुपने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला होता, विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतक-यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चर, आकार आदी वैशिष्ट्ये लाभतात. त्यास मानांकनातून भौगोलिक निर्देशन मिळत असते. भौगोलिक मानांकनामुळे शेतीमालास प्रतिष्ठा मिळते, नेमकी ओळख होते, गुणवतेची खात्री असते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी प्राप्त होते. यामुळेच लासलगावचा कांदा हा जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
जगातील उत्पादनापैकी २२ टक्के उत्पादन भारतात
कांदा उत्पादनाच्या बाबतीत जगात चीनचा पहिला, तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात साधारणपणे १८ लाख हेक्टर क्षेत्रावर ३०० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होते. जगात ५० लाख हेक्टर क्षेत्रावर २००० लाख टन अपाटन होते. जागतिक उपादनाच्या २२ टक्के उत्पादन भारतात होते. त्यावरून भारतात कांदा पिकाचे सेठीमधील असलेले महत्त्व लक्षात येऊ शकते. जागतिक उत्पादकतेच्या तुलनेत भारताची उत्पादकता भाव कमी आहे. भारताची अत्पादकाची १६८.१४ टन प्रति हेक्टरी, अमेरिकेची उत्पादकता ४८ टन प्रतिहेक्टरी, तर चीनची उत्पादकता २९ टन प्रतिहेक्टरी आहे. त्यावरून कांदाच्या अत्पादकतेत कृषी विभागाला मोठा टप्पा गाठायचा आहे. हे आपण समजू शकतो.
27 राज्यात कांदा उत्पादन
भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आरखंड, तामिळनाडू या राज्यांत प्रामुख्याने कांदा पीक होते. त्यातही महाराष्ट्र (३० टक्के) व मध्य प्रदेशात (१७ टक्के) साधारण ५० टक्के कांटा अपादन होते. २५ वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील ठराविक भागात मोठ्या प्रमाणात होणारा कांदा नंतर महाराष्ट्रात आणि दशकभरापूर्वी केवळ सात-आठ राज्यांत घेतले जाणारे हे पीक आता भारतातील जवळपास २७ राज्यांत घेतले जाते. यावरून कांद्याचे वाढलेले क्षेत्र व उत्पादन स्पष्ट होऊ शकते. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.