Lokmat Agro >शेतशिवार > विषमुक्त शेती काळाची गरज, पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांचं मत

विषमुक्त शेती काळाची गरज, पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांचं मत

Latest News Organic farming alternative to chemical farming says parchi mahurkar in agri festival | विषमुक्त शेती काळाची गरज, पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांचं मत

विषमुक्त शेती काळाची गरज, पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांचं मत

निरोगी व सदृढ नागरिकांसाठी विषमुक्त शेती एकमेव पर्याय असल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांनी व्यक्त केले.

निरोगी व सदृढ नागरिकांसाठी विषमुक्त शेती एकमेव पर्याय असल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांनी व्यक्त केले.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही वर्षात शेतीत अनेक बदल होत आहेत, प्रयोग होत आहेत. मात्र यामुळे रासायनिक खतांचा भडिमार शेतीवर होताना दिसून येत आहे. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक औषधांच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निरोगी व सदृढ नागरिकांसाठी विषमुक्त शेती एकमेव पर्याय असल्याचे मत पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांनी व्यक्त केले.

आजच्या तिसऱ्या दिवशी नाशिक मध्ये आयोजित जागतिक कृषी महोत्सवात पर्यावरण तज्ञ प्राची माहुरकर यांनी संबोधित केले. यावेळी त्या बोलत होत्या. माहुरकर यांनी पर्यावरण आणि शेती शी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाय सध्याच्या रासायनिक शेतीला पर्याय म्हणून विषमुक्त शेतीकडे वळण्याकडे शेतकऱ्यांना सल्ला दिला. माहुरकर म्हणाल्या की, अन्नधान्यातील पोषणमुल्य कमी झाले असून विषतत्व वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसारखा चांगला संशोधक नाही. त्यामुळे यावर मात करण्यासाठी शेतीसाठी सामूहीक पिक पद्धती म्हणजेच (बहुपीक) पद्धती अवलंबवावी लागेल. मातीची पाणी धारण क्षमता वाढवावी लागेल. तृणधान्य ची शेती वाढवावी लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.

पुढे त्या म्हणाल्या की, जीवनाची अनिश्चितता कमी करणे आपल्या हाती असून मनशांती साठी पर्यावरणपुरक जीवनशैली गरजेची आहे. त्यासाठी राष्ट्रीय सौरउर्जा मिशन, प्रगत उर्जा सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही आवास / शेती, राष्ट्रीय जल मिशन, हरीत भारत मिशन या गोष्टीचा समावेश होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  सध्या निसर्गाची हानी होत असून ती थांबवने महत्वाचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. टेरेसवर चांगली झाडे लावणे आवश्यक असून निदान नैसर्गिक भाजीपाला तयार होण्यास मदत होईल. शिवाय झाडांशी संवाद साधल्याने ताणतणाव देखील कमी होतो. सध्या सशक्त वाणांची गरज असून रानभाज्या, तृणभाज्या आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. या कोणत्याही रोगाला बळी पडत नाही, मात्र सद्यस्थिती आपण या रानभाज्यांची रोगप्रतिकारक क्षमता आपण कमी केल. अती उत्पन्नाच्या हव्यासापोटी विषाची निर्माती अन्नामध्ये झाली असून पुन्हा शास्वत अन्न निर्मिती ही काळाची गरज आहे.

जलसंवर्धन ही काळाची गरज 

पाण्याचा काटकसरीने वापर करावा पाणी जमीनीत रुजवावे / अडवावे, जिरवावे, शेतीत पालापाचोळ्याचे आच्छादन अत्यंत महत्वाचे आहे. वाहून जाण्याने पाणी अडवल्यास सेंद्रीय कर्ब वाढते, पालपाचोळा कंपोस्ट होतो. उंदीर, घुशी या खुप मोठ्या प्रमाणात बिळांच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी यामुळे जमिनीत मुरण्यास मदत होते.

Web Title: Latest News Organic farming alternative to chemical farming says parchi mahurkar in agri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.