Lokmat Agro >शेतशिवार > 'कणगी' म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी, साठवणुकीच्या पद्धती कालबाह्य

'कणगी' म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी, साठवणुकीच्या पद्धती कालबाह्य

Latest News Outdated rice storage methods | 'कणगी' म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी, साठवणुकीच्या पद्धती कालबाह्य

'कणगी' म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी, साठवणुकीच्या पद्धती कालबाह्य

सद्यस्थितीत कणगे या भात साठवणुकीच्या पद्धतीसह इतर साठवणुकीच्या पद्धती लुप्त झाल्या आहेत.         

सद्यस्थितीत कणगे या भात साठवणुकीच्या पद्धतीसह इतर साठवणुकीच्या पद्धती लुप्त झाल्या आहेत.         

शेअर :

Join us
Join usNext

सध्या कोकणासह राज्यातील भात उत्पादक जिल्ह्यात भाताची साठवणूक सुरू आहे. अनेकजण साठवणूक न करता थेट व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत. पूर्वी भात साठविण्याच्या विविधांगी पद्धती उपयोगात आणल्या जात होत्या. यामध्ये कणगे हा महत्वपूर्ण प्रकार होता. या कणग्यांमध्ये जवळपास आठशे ते हजार क्विंटलपर्यंत भाताची साळ साठवून ठेवली जात असे. मात्र सद्यस्थितीत या पद्धतीसह इतर साठवणुकीच्या पद्धती देखील लुप्त झाल्या आहेत. 
       
महाराष्ट्र्रातील अनेक भागातील शेतकरी पूर्वी वर्षभर पुरेल एवढे धान्य आणि बियाणं सांभाळून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती वापरत असतं. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात साठवणुकीसाठी अशा पद्धती वापरल्या जात. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने अनेकदा कणगे, बळद आदीसंह इतर पारंपरिक साठवण पद्धत वापरली जात. साधारण भात काढणी झाल्यानंतर भात घरी आणून कणग्यांमध्ये साठवलं जातं. मात्र हळूहळू हे कणगे दृष्टीआड होऊ लागले आहेत. 

साठवणुकीच्या पद्धती कोणत्या होत्या? 

काही वर्षांपूर्वी गावोगावी धान्य साठविण्यासाठी बांबू किंवा गवतापासून तयार केलेल्या साधनांचा वापर केला जात असे. यात कणग, तट्टा, बळद  इत्यादीचा वापर केला जात असे. प्रत्येक घरात साठवणुकीसाठी यापैकी एखाद्या साधनांचा वापर केला जात असे. अनेकदा काही यात तरबेज असणारी गावातील काही निवडक मंडळी धान्याच्या मोबदल्यात हे विकत असतं. मुख्यत्वे भाताची साठवणूक बाबूंपासून तयार केलेल्या कणग्यांमध्ये जमिनीपासून काही उंचीवर अशी केली जात असे. या कणग्यात धान्य अनेक वर्ष टिकत असल्याने याचा वपतर केला जय. शिवाय धान्याला कीड लागत नसायची. तसेच कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय वर्षभरासाठी धान्य साठवली जात. 

कणगे कसे असायचे?        
      
भात साठवण्यासाठी याचा वापर केला जात असे. कणगे प्रामुख्याने बांबूच्या पातळ बेळांनी विणली जायची. साधारण सहा ते सात फुटाची असायची. यात भात, तांदूळ, नाचणी इत्यादी धान्यांची साठवण केली जात असे. नवी कणग वापरण्यापूर्वी ती आतून बाहेरून शेणाने सारवून घेतली जात असे. उन्हात चांगली वाळल्यावर त्यात धान्य भरलं जायचं. भरून झाल्यावर कणगीच्या तोंडावर गवत पसरवून ते शेणाने लिंपलं जायचं. कणगीत साधारण आठशे ते हजार क्विंटल इतके भाताचे साळ मावत असायचे. त्याकाळी घरातील कणगी बघून विवाह ठरविला जात असे. मात्र आता हीच कणगी शेतकऱ्यांकडून हद्दपार करण्यात आल्याचे चित्र आहे. 

तट्टा, बळद हे त्यातलेच प्रकार...  

त्याकाळी काही भागात साठवणुकीसाठी तट्टा वापरला जात असे. तट्टा हा रुंद बेळांनी विणला जात असे. याची उंची आठ ते नऊ फूट असायची. तसेच दोन्ही बाजू एकत्र केल्यास पिंपासारखा आकार होत असे. घरातील ज्या जागेवर तट्टा ठेवायचा असायचा तिथे गवत पसरवून शेणाने सारवले जात असे. त्यावर तट्टा ठेऊन त्यात धान्य ठेवले जात असे. तर बळद म्हणजे घराच्या भिंतीला तिन्ही बाजूंनी मातीच्या विटांचे आयताकृती बांधकाम करून बनवलेली उभट रचना होय. यामध्ये मुख्यत भात/साळची साठवणूक केली जाते. याची उंची 5 ते 7 फुटांपर्यंत असून यामध्ये 500 क्विंटल ते हजार क्विंटलपर्यंत साठवणूक करता येत असे. तसेच यात साठवलेलं साळ जवळपास 3 वर्षापर्यंत टिकायचे. समोरील बाजूस एक लहानसा छिद्रातून आतील धान्य काढून घेता येत असे. पुन्हा हे छिद्र शेणमातीच्या सारवनाने बंद केले जात असे. 

Web Title: Latest News Outdated rice storage methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.