Join us

Paddy Crop : पावसामुळे भात कापणी लांबणीवर, शेतकरी चिंतेत, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 8:34 PM

Paddy Crop : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची भात शेती पाण्यात सापडली आहे.

Paddy Crop : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे  (rain) अनेक ठिकाणची भातशेती पाण्यात (Rice Farming) सापडली आहे. राज्यातील अनेक भागात भात कापणीला आले असताना पावसामुळे भात शेती पूर्णतः झोपवून दिली आहे. कापणीला आलेल्या भात पिकाला पाण्याची फारशी गरज नसते. मात्र अशा परिस्थितीत शेतात पाणी भरल्याने भात पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून भात कापणी लांबणीवर पडली आहे. 

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिकसह (Nashik) कोकणातील भात शेतीवर चांगलाच परिणाम झाला आहे. कापणीसाठी परिपक्व झालेली भात पिके आणि नाचणी-वरई शेतातच आडवी झाल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. भातशेतीत पाणी साचल्याने हाता तोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची भीती आहे. दिवाळीपर्यंत भात कापणीची तयारी सुरू असते. यासाठी कापणीच्या साहित्याची जुळवा जुळव करणे. मजुरांची जुळवाजुळव करणे आदी कामे होत असतात. अशातच पाऊस झाल्याने भात कापणीचे नियोजनच कोलमडले आहे. 

कापणीच्या वेळी शेतात पाणी राहिल्यास कापलेला कडपा व्यवस्थित ठेवता येत नाही. कापलेल्या भाताच्या लोंबे पाण्यात भिजल्याने दाणा खराब होतो. त्याचबरोबर चिखलातून भात कापणी करण्यासाठी ज्यादा मनुष्यबळाची गरज भासते. अशा अनेक समस्यांमुळे भात कापणी लांबणीवर पडलेली आहे. परंतु पाणी जास्त असल्यास भात वाळत ठेवता येणे शक्य नसते. अशा परिस्थितीत शेतात पाणी भरल्याने भात पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून भात कापणी लांबणीवर पडली आहे.

भात पिकाचे नुकसान 

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने भात उत्पादक शेतकरी सुखावले होते. भात पिके ही जोमात होती. मात्र यावर्षी ऑक्टोबर शेवटी परतीच्या पावसाने ऐन भात कापणीच्या वेळेस थैमान घातल्याने भातपिके शेतातच आडवी झाली आहेत. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापलेले भातपीक शेतात आहे तर काही पीक कापणीच्या लायक शिल्लक राहिलेले नाही. सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने परिपक्व झालेली भात पिके निकृष्ट दर्जाची झाली असून भात पिकापासून मिळणारी, गुरांच्या वैरणीचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :भातशेती क्षेत्रशेतीनाशिकपाऊस