Join us

Paddy Harvesting : भात कापणी मशीनला शेतकरी नापसंती देत आहेत? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 4:36 PM

Paddy Harvesting : यंदा मात्र तुरळक ठिकाणीच या मशीन दिसू लागले आहेत. शिवाय शेतकऱ्यांनी देखील मशीनद्वारे भात कापणीला नको म्हटले आहे. 

Paddy Harvesting : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात (Nashik) भात कापणी सुरू झाली आहे. मात्र दिवाळी आणि दुसरीकडे इतरही शेती कामे सुरू असल्याने मजुरांची टंचाई आहे. तसेच दरवर्षी भात कापणीची मशीन मोठ्या प्रमाणावर शेत शिवारात दिसत होती. यंदा मात्र तुरळक ठिकाणीच या मशीन दिसू लागले आहेत. शिवाय शेतकऱ्यांनी देखील मशीनद्वारे भात कापणीला (Paddy Harvesting) नको म्हटले आहे. 

ऐन दिवाळीतच भात कापण्याची लगबग सुरू होत असते यंदाही भात कापणी सुरू झाली आहे मात्र मजूर नसल्याने ही कापणी कासव गतीने सुरू असल्याचे चित्र आहे दुसरीकडे दरवर्षी शेतकरी मजूर नसल्याने मशीनचा वापर करत भात कापणी करायचे मात्र यंदा मशीनची संख्या कमी असल्याने शेतकरीच भात कापणीला प्राधान्य देत आहे.

भात कापणीला साधारण एक छोटे मशीन अनेक मोठे मशीन वापरले जाते. यात छोटे मशीन हे भात कापणी करत असते. मात्र यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना शेतातील काठ कापून घ्यावे लागतात. जेणेकरून मशीनला सोयीस्कर होईल. मात्र कापणीनंतर शेतकऱ्यांना हेच भात पीक उचलण्यास अधिक वेळ खर्च जात असतो, तर दुसरीकडे मोठे मशीन हे भात कापणीसह थेट भात मळणी करून देत असते. मात्र या मशीनचा तोटा असा होतो की यातून उरलेली भाताची पेंढी चाऱ्यासाठी उपयुक्त ठरत नाही. करण मोठ्या मधीनमध्ये थेट पुर्ण पेंढीसह मळणी होत असल्याने काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे या मशीनकडे देखील शेतकरी कानाडोळा करतात.

कोणत्या मशीनला किती मजुरी?

साधारण छोट्या मशीनला तासानुसार पैसे दिले जातात. एक तासात जेवढं काम होईल, तेवढं पैसे ठरलेले असतात. सध्या एक तासाचे 700 ते 800 रुपये होत असतात. तर मोठे मशीन हे तासानुसार आणि जास्त क्षेत्र असल्यास एकरी पैसे घेत असते. याचा दर साधारण हजार ते 2000 रुपयांपर्यंत क्षेत्रानुसार असतो.

हेही वाचा : Paddy Harvesting : भात सोंगणीला 500 रुपये रोज देऊनही मजूर मिळेना, वाचा सविस्तर

टॅग्स :भातशेती क्षेत्रकाढणीनाशिक