नाशिक : सध्या भात कापणीची (Paddy Harvesting) लगबग सुरु आहे. त्यातच सर्वच शेतकऱ्यांची कामे एकत्रित आल्याने मजूर मिळणे अवघड झाले आहे. अशात भात कापणीसाठी छोटी मशीन आणि भात कापणीसह मळणी करणारी मोठी मशीन काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. भात काढणीच्या हार्वेस्टर (Harvester Machine) या मशीनला तासाला जवळपास तीन ते साडे तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.
शेतातील कुठलेही पीक असोत. शेतीतील विविध कामांसाठी मजुरांची मोठी आवश्यकता असते. सद्यस्थितीत भात कापणीची कामे सुरु आहे. या कापणी व मळणीच्या कामांसाठी मजुरांची मोठी आवश्यकता असते. मात्र ऐन धान कापणीला आले की मजुरांची उणीव भासत असते. त्यामुळे कापणी लांबते व त्याचा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. त्यामुळे आता रब्बी पिकांसह खरीप हंगामातील धान पिकाचीही थेट हार्वेस्टरद्वारे कापणी व मळणी केली जात आहे.
साधारणतः मळणीसाठी शेतकऱ्यांना दीड हजारांवर खर्च येतो. एकूण पिकाचा खर्च ५ ते ५ हजार ५०० रुपये खर्च येतो. हार्वेस्टरद्वारे कापणी व मळणी एकाच वेळी होत असते. आणि जवळपास तीन हजार ते तीन हजार ५०० रुपये हार्वेस्टरचा खर्च येतो. लवकर काम उरकत असल्याने पुढील रब्बी पिकांसाठी जागाही उपलब्ध होत असते. त्यामुळे पावसाळी पिकांची कापणी व मळणी करण्याचा बहुतांश शेतकऱ्यांनी सपाटा लावला असल्याचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे चित्र आहे.
असा येतो खर्च
तासानुसार हार्वेस्टरचे भाडे दरवर्षी एकरी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांप्रमाणे हार्वेस्टरद्वारे धान पिकाची कापणी, मळणी केली जात होती. मात्र आता ताशी ०३ ते ०३ हजार ५०० रुपये भाडे असा दर ठरला आहे. परिणामी शेतकऱ्यांना तासानुसार पैसा द्यावा लागत आहे. पूर्वी पंजाब राज्यातून तालुक्यात हार्वेस्टर मशीन धारक यायचे. परंतु आता जिल्ह्यातच अनेकांनी हार्वेस्टर मशीन खरेदी केल्या असून व्यवसाय करीत आहेत.
मजूरदारांद्वारे धान कापणी व मळणी केली तर धान पीक घरी यायला खूप वेळ वाट पाहावी लागते. शिवाय निसर्गाचा कोप झाला की पिकांची घट ठरलेली असते. मात्र हार्वेस्टरमुळे वेळ व पैशाची खूप बचत होते. त्यामुळे हार्वेस्टरद्वारे धान कापणी व मळणी करणे फायद्याचे ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत.
- कालिदास मन्साराम निकुरे, - युवा शेतकरी, सावरगाव
हेही वाचा : Paddy Harvesting : पारंपरिक भात मळणीसाठी खळे कसे तयार करतात? जाणून घ्या सविस्तर