Lokmat Agro >शेतशिवार > Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

Latest News Paddy planting in Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur etc districts along with Nashik in final stage | Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

Paddy Cultivation : भात लागवड आली अंतिम टप्प्यात, महिनाभर चालला आनंदाचा सोहळा! 

Paddy Cultivation : नाशिकसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.

Paddy Cultivation : नाशिकसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- हरिश्चंद्र हेडाऊ 

Agriculture News : नाशिकसह (Nashik) भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.  आता शेतकरी भात पिकाला खत देण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. तसेच महिला वर्गाकडून शेतात निंदणीचे काम केले जात आहे. जवळपास महिनाभर भात लागवड सुरु असते. पावसावरच ही शेती अवलंबून असल्याने काही भागात उशिरा पाऊस झाल्याने भात लागवड लांबल्याचे दिसून आले. 

यंदा भात शेतीच्या (Rice Farming) कामासाठी मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर दिसून आला. मात्र भात पीक लागवडीचे (Paddy cultivation) काम हे मजुरांकडून करण्यात आले. तसेच यंदा गुत्त्याच्या माध्यमातून धान रोवणी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. त्यामुळे रोवणीकरिता गावातील मजुरांना शोधून आणून एकत्र करण्याचा त्रास शेतकऱ्यांना करावा लागत नाही. गावातील २५ ते ३० महिला व पुरुष मजूर समूहाने एकत्रितपणे येऊन गुत्ता तयार करतात. ग्रामीण भागात गुत्ता पद्धतीचे प्रस्थ वाढत आहे.

लाखनी तालुक्यातील किटाडी व परिसरात सर्वत्र रोवणीची लगबग वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गुत्ता पद्धतीचा अवलंब केला जात आहे. सध्या गुत्ता पद्धतीत रोवणीचा दर प्रतीएकर ४ हजार रुपये ठरलेला आहे. नियमितपणे सतत पडणारा पाऊस व मजूर टंचाईमुळे गुत्ता पद्धतीने रोवणी उरकण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. मात्र, अलीकडे रोवणी समाप्तीचा व चिखल खेळण्याचा आनंद ओसरल्याचे दिसते. 

महिला-पुरुष एकात्मेतेचे दर्शन 

गुत्ता पद्धतीत एका मजुराची गुत्त्याचा प्रमुख अर्थात मेटकर म्हणून निवड केली जाते. प्रमुख मजूर गुत्त्यातील सर्व मजुरांच्या संमतीने रोवणीचे दर ठरवितो. प्रमुखाने ठरविलेला दर गुत्त्यातील सर्वच मजुरांना मान्य असतो. खरीप हंगामात गुत्त्याच्या माध्यमातून मजुरांना जवळजवळ महिनाभर रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. एकमेकांच्या सहकार्याने रोवणी पूर्णत्वास आणत असतात. गुत्त्याच्या माध्यमातून महिला व पुरुष मजूर वर्गाच्या एकात्मतेचे दर्शन घडत असते. 

अशी करावी लागते रोवणीची तयारी
भातशेती हे अतिशय कष्टाचे काम, रोवणी करताना धुरे-पारे मारणे, कॉटे काढणे, पुरुष मजुरांचे काम पन्हे काढणे, चिखलणी केलेल्या बांध्यात पन्ह्यांच्या पेंड्या पसरविणे, रोवणीच्या बांध्यात नांगर अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी करणे, तेव्हाच रोवणीची तयारी पूर्ण होते. रोवणीचा हा आनंदाचा सोहळा शेतकरी आपल्या शेतात फुलवितात.
 

Web Title: Latest News Paddy planting in Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur etc districts along with Nashik in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.