Pik Vima 2024 :रब्बी हंगामातील (Rabbi Season) पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत 18 लाख 79 हजार 822 अर्ज आले आहेत. यातून 13 लाख 37 हजार 336 हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे साडेपाच हजार कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.
शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा (Rabbi Onion) या पिकांसाठी 17 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात किमान 10 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक 2 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. पुणे विभागातून 2 लाख 42 हजार 527 तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नाही. रायगडमधून एक, रत्नागिरीमधून पाचथ तर सिंधुदुर्गमधून सहा अर्ज आले आहेत.
लातूर विभागातून सर्वाधिक
लातूर विभागातून सर्वाधिक 7 लाख 22 हजार 119 अर्ज आले आहेत. एकूण अर्जामुळे राज्याला 36 कोटी तर केंद्र सरकारला 218 कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्यात गेल्यावर्षी सथी हगामात एकूण 79 लाख 87 हजार 182 अर्ज आले होते.
विभागनिहाय अर्जाची संख्या
विभागनिहाय अर्जाची संख्या बघितली तर कोकण विभागात 12, नाशिक विभागात एक लाख 22 हजार 776, पुणे विभागातून दोन लाख 42 हजार 597, कोल्हापूर विभागातून 53 हजार, छत्रपती संभाजीनगर विभागातून चार लाख 45 हजार 103, लातूर विभागातून सात लाख 22 हजार 179, अमरावती विभागातून दोन लाख 58 हजार 706, नागपूर विभागातून 34,245 असे एकूण 18 लाख 79 हजार 822 अर्ज दाखल झाले आहेत.
Maharashtra Rabi Perani : यंदा राज्यात रब्बी पेरणी दहा टक्के वाढणार; किती झाली पेरणी