Join us

Pik Vima Yojna : पीक विमा योजेनसाठी पाच दिवस शिल्लक, शेतकरी बांधवाना नोंदणीचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 6:18 PM

Pik Vima 2024 : 15 जुलैनंतर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत (Pik Vima Yojna) सहभागी होता येणार नाही.

Pik Vima Yojna : 15 जुलैनंतर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत (Pik Vima Yojna) सहभागी होता येणार नाही. त्यामुळे नाशिक तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 असून सर्व शेतकरी बांधवांना नोंदणी करावी. शेवटचे पाच शिल्लक असल्याने लवकरात लवकर अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

या योजनेत खरीप हंगामातील (Kharif Yojna) सोयाबीन, भात, मुग, उडीद, भुईमूग, मका या पिकांची विमा नोंदणी (Crop Insurance) करण्यात येणार आहे. केवळ 1 रु भरून योजनेत नोंदणी करता येणार आहे. या खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थिती, उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान याबाबी पासून पिकास विमा संरक्षण मिळणार आहे. विमा csc /सेतु केंद्रावर भरावयाचा असुन 1 रुपया व्यतिरिक्त अधिकची रक्कम देऊ नये. 

या योजनेत पिक निहाय सोयाबीन प्रति हेक्टर रक्कम रु 49500, भात प्रति हेक्टर रक्कम रु 49500, भुईमूग प्रति हेक्टर रक्कम रु 42971, सोयाबीन प्रति हेक्टर रक्कम रु 35598 एवढी रक्कम संरक्षित केली आहे. तरी शेवटच्या दिवसामध्ये योजनेच्या पोर्टल वर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. तरी. कृपया सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलै 2024 आतच पिक विमा भरावा.

शेवटचे पाच दिवस 

तसेच या हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा अर्ज भरले जात असून अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा, आठ अ उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे, असे तालुका कृषी अधिकारी  भटू पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :पीक विमापीक कर्जशेतीशेती क्षेत्र