Lokmat Agro >शेतशिवार > Crop Insurance : तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी भरला पीकविमा अर्ज, वाचा सविस्तर 

Crop Insurance : तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी भरला पीकविमा अर्ज, वाचा सविस्तर 

Latest News PM Fasal Yojna 2 lakh 67 thousand 303 farmers registered crop insurance applications in 24 hours | Crop Insurance : तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी भरला पीकविमा अर्ज, वाचा सविस्तर 

Crop Insurance : तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांनी भरला पीकविमा अर्ज, वाचा सविस्तर 

Crop Insurance : तर मागील २४ तासात २ लाख ६७ हजार ३०३ शेतकऱ्यांनी पीकविमा (Pik Vima Yojna) अर्ज भरला आहे. 

Crop Insurance : तर मागील २४ तासात २ लाख ६७ हजार ३०३ शेतकऱ्यांनी पीकविमा (Pik Vima Yojna) अर्ज भरला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Crop Insurance :खरीप हंगामाच्या (Kharif Season) सुरूवातीला एक रुपयात पीकविमा योजनेला (PM Fasal Yojna) सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून २५ जून २०२४  अर्थातच मंगळवारपर्यंत राज्यातील १५ लाख १४ हजार ५३१ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी सहभाग नोंदवला आहे. तर मागील २४ तासात २ लाख ६७ हजार ३०३ शेतकऱ्यांनी पीकविमा (Pik Vima Yojna) अर्ज भरला आहे. 

नाशिक आणि कोकण विभाग 

राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून विविध पिकांचा विमा उतरवला आहे. दरम्यान १५ जुलै २०२४ पर्यंत पिक विम्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पिक विम्यासाठी अर्ज केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे सांगितले जात आहे. जर  जिल्हानिहाय पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी पाहिली असता आजच्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील 1360, पालघर जिल्ह्यातील 1367, रायगड जिल्ह्यातील 271, रत्नागिरी जिल्ह्यातील 172, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 531 अशा कोकण विभागातील तीन हजार 701 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 50 हजार 279, धुळे जिल्ह्यातील 19 हजार 604, नंदुरबार जिल्ह्यातील 3743 तर जळगाव जिल्ह्यातील 26 हजार 518 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून जवळपास नाशिक विभागातून 01 लाख 134 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.


पुणे, औरंगाबाद विभाग 

त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एक लाख 11 हजार 647 पुणे जिल्ह्यातील 19 हजार 277 सोलापूर जिल्ह्यातील 64 हजार 357 अशा एकूण 01 लाख 95 हजार 95 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. सातारा जिल्ह्यातील 2134, सांगली जिल्ह्यातील 11 हजार 763, कोल्हापूर जिल्ह्यातील 421 अशा एकूण कोल्हापूर विभागातील 14 हजार 318 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे.  तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख 8719, जालना जिल्ह्यातील एक लाख 23 हजार 719, बीड जिल्ह्यातील 02 लाख 31 हजार 187 अशा एकूण औरंगाबाद विभागातील 05 लाख 42 हजार 25 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.

नागपूर, अमरावती विभाग 

लातूर जिल्ह्यातील 61 हजार 917 धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 38 हजार 998 नांदेड जिल्ह्यातील 59 हजार 755 परभणी जिल्ह्यातील 91 हजार 355 हिंगोली जिल्ह्यातील 47 हजार 762 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील ६५ हजार २३६ अमरावती जिल्ह्यातील ०९ हजार ७०६ अकोला जिल्ह्यातील २१५८, वाशिम जिल्ह्यातील 53 हजार 559, यवतमाळ जिल्ह्यातील 58 हजार 119 अशा एकूण अमरावती विभागातील ०२ लाख 8 हजार 178 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील १० हजार ९५६ नागपूर जिल्ह्यातील 16 हजार 418, भंडारा जिल्ह्यातील ०६ हजार ६७०, गोंदिया जिल्ह्यातील 10 हजार 07, चंद्रपूर जिल्ह्यातील 5584, तर गडचिरोली जिल्ह्यातील 1461 अशा एकूण नागपूर विभागातील 51 हजार 96 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.

Web Title: Latest News PM Fasal Yojna 2 lakh 67 thousand 303 farmers registered crop insurance applications in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.