Namo Shetkari Hafta : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9Namo Shetkari Sanman Yojana) हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पीएम किसानचा हफ्ता (PM Kisan Scheme) मिळून एक महिना होउनही अद्याप या योजनेचा हफ्ता मिळालेला नाही. शिवाय १ मार्च पूर्वी या आर्थिक वर्षातील निधी वितरित होणे आवश्यक असताना या योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित होणार असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
एकीकडे सरकार या योजनेबाबत म्हणतय की, या योजनेमध्ये 6000 च्या ऐवजी 9000 देणार आहेत. मात्र ही आहेत तेच हफ्ते वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. पीएम किसानच्या हफ्त्यावेळी नमोचा हफ्ता १ मार्च नंतर मिळणार मात्र आता मार्च संपत आला असताना अद्याप कोणतीही हालचाल सरकारकडून दिसून येत नाही. परिणामी या 31 मार्चपूर्वी हा हफ्ता मिळणे आवश्यक होतं, पण सध्यातरी तशी परिस्थिती नाही. या सर्व विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
दुसरीकडे लाडकी बहीण योजना राबवत असताना इतर योजनांचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात जात असल्याचा आरोप आहे. त्या अनुषंगाने अनेक योजनांचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यातच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळाला नसल्याने शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण यापूर्वी पीम किसान चा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही सोबत मिळाले होते. मात्र यावेळी केवळ पीएम किसानचा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर आला, मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर येणार असल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक वर्षातील दायित्व दरम्यान 31 मार्च पूर्वीच या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हफ्ता वितरित होण आवश्यक होतं, परंतु अद्याप देखील तशी चिन्हे दिसून येत नसल्याचे चित्र आहे. 31 मार्चसाठी केवळ चार दिवस शिल्लक असून तत्पूर्वी याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आलेला नाही नाही. मग या आर्थिक वर्षातील नियोजनाचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतो. या आर्थिक वर्षातील दायित्व याच आर्थिक वर्षात वितरित होणे गरजेचे आहे. मग पुढील चार दिवसांमध्ये सरकार निधी वितरित करणार कसा असाही सवाल आहे.