Lokmat Agro >शेतशिवार > PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्षे, काय आहे ही योजना? 

PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्षे, काय आहे ही योजना? 

Latest News Pm Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana for five years know details scheme | PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्षे, काय आहे ही योजना? 

PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्षे, काय आहे ही योजना? 

PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत, काय आहे ही योजना समजून घेऊयात... 

PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत, काय आहे ही योजना समजून घेऊयात... 

शेअर :

Join us
Join usNext

PM kmy Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा (PM KMY Scheme) प्रारंभ 12 सप्टेंबर 2019 रोजी झाला. ही ‘पीएम-केएमवाय’ देशभरातील सर्व लहान आणि अल्‍प भूधारक  शेतकऱ्यांना  सामाजिक सुरक्षा प्रदान करीत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वयाची साठ वर्ष  पूर्ण झाल्यावर निश्चित मासिक निवृत्‍ती वेतन  3,000 रूपये दिले जाते. या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत, काय आहे ही योजना समजून घेऊयात... 

या योजनेतून शेतकऱ्यांना  वृद्धापकाळात  निवृत्ती वेतन दिले जाते. ही एक ऐच्छिक आणि योगदानात्मक निव़ृत्ती वेतन  योजना आहे.  या उपक्रमांतर्गत पात्र लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वयाची साठ वर्ष  पूर्ण झाल्यावर निश्चित मासिक निवृत्‍ती वेतन  3,000 रूपये दिले जाते. या योजनेत सहभागी होण्‍यासाठी शेतकरी बांधवांना  ते कार्यरत असतानाच्या वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन निधीमध्ये  मासिक योगदान द्यावे लागते. शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानाइतका निधी केंद्र सरकारकडून दिला जातो.

‘पीएम-केएमवाय’ची अंमलबजावणी

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमवाय) अंतर्गत, लहान आणि अल्‍पभूधारक शेतकरी पेन्शन फंडाची मासिक सदस्यता भरून नोंदणी करू शकतात. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्‍यासाठी साधारणपणे दरमहा 55 रूपये ते 200 रूपये ते 60 वर्षांचे होईपर्यंत योगदान देणे आवश्यक आहे.

शेतकऱ्याचे वय 60 वर्ष झाले की, या योजनेत नावनोंदणी केलेल्या आणि एक्सल्युजन निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना  मासिक 3,000 रूपये पेन्‍शन सुरू होणार आहे. एलआयसी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करीत आहे आणि लाभार्थी नोंदणीची सुविधा कॉमन सर्व्हिस सेंटर्स आणि राज्य सरकारांमार्फत केली आहे.

दि. 1 ऑगस्ट 2019 च्या नोंदीप्रमाणे दोन  हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीमध्ये सूचीबद्ध असलेले सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत लाभांसाठी पात्र आहेत. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 23.38 लाख शेतकरी या योजनेत सहभागी  झाले आहेत. या योजनेंतर्गत, नोंदणी करणा-यांमध्‍ये बिहार राज्य आघाडीवर आहे.बि हारमध्‍ये  3.4 लाख  शेतकऱ्यांनी नोंदणी केली  आहे, तर झारखंडमधील 2.5 लाखांपेक्षा जास्‍त शेतकरी  आपले नावे नोंदवून दुसऱ्या स्थानावर आहेत. 

पीएम-केएमवायचे मिळणारे मुख्‍य लाभ

• किमान निश्चित  निवृत्ती वेतन

• कौटुंबिक निवृत्ती वेतन 

• पीएम- किसान योजनेचे  लाभ

• सरकारचे समान योगदान

• मासिक योगदान

नावनोंदणी प्रक्रिया

‘पीएम-केएमवाय’त नावनोंदणी करण्यासाठी, पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) भेट द्यावी किंवा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारांनी नियुक्त केलेल्या नोडल अधिका-याशी  (पीएम-किसान) संपर्क साधावा.तसेच  www.pmkmy.gov.in या योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलवरूनही नोंदणी पूर्ण केली जाऊ शकते.

Web Title: Latest News Pm Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana for five years know details scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.