Lokmat Agro >शेतशिवार > Rabbi Biyane : रब्बी हंगामातील बियाण्यांची विक्री, हरभरा, ज्वारी, करडईचे 'हे' वाण उपलब्ध 

Rabbi Biyane : रब्बी हंगामातील बियाण्यांची विक्री, हरभरा, ज्वारी, करडईचे 'हे' वाण उपलब्ध 

Latest News Rabbi Biyane Sale of Rabi season seeds, gram, sorghum, sorghum varieties available  | Rabbi Biyane : रब्बी हंगामातील बियाण्यांची विक्री, हरभरा, ज्वारी, करडईचे 'हे' वाण उपलब्ध 

Rabbi Biyane : रब्बी हंगामातील बियाण्यांची विक्री, हरभरा, ज्वारी, करडईचे 'हे' वाण उपलब्ध 

Rabbi Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ज्वारी, हरभरा, करडई पिकांच्या बियाण्यांसह भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची विक्री सुरु झाली आहे.

Rabbi Biyane : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ज्वारी, हरभरा, करडई पिकांच्या बियाण्यांसह भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची विक्री सुरु झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Rabbi Biyane : रब्बी हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (MPKV) रब्बी बियाण्यांच्या विक्रीला सुरवात झाली आहे. यात ज्वारी, हरभरा, करडई पिकांच्या बियाण्यांसह (Sorghum Seed) भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची विक्री सुरु झाली आहे. फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातुन विकसित करण्यात आलेले वाण विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. 

रब्बी हंगामातील बियाण्यामध्ये (Rabbi Biyane) हरभरा पिकाचे फुले विकांत, फुले विशाल, फुले विश्वराज, फुले विक्रम हे वाण उपलब्ध आहेत. तर करडई पिकाचे फुले भिवरा हे वाण उपलब्ध आहे. तसेच ज्वारी पिकाचे फुले वसुधा, फुले सुचित्रा, फुले यशोमती हे वाण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर भाजीपाला पिकांमध्ये गवार, भोपळा, वांगी, मिरची, घोसाळे, कारले आदी पिकांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. 

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. किंवा विद्यापीठाच्या ०२४२६-२४३३४५, २४३२७९,२४३०५१ या नंबरवर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. 

रब्बी वाण आणि दर प्रति बॅग 

तृणधान्य बियाणे उपलब्ध 

अ.क्रपिकवाणबियाणाचे प्रकारदर प्रती ब्यॉगविक्रीसाठी उपलब्ध ब्यॉगक्विंटल
1हरभराफुले विकांतसत्यप्रतरु .२४००/-प्रती बॅग ३० किलो८३ बॅग८३ बॅग
2हरभराफुले विशालसत्यप्रतरु .२४००/-प्रती बॅग ३० किलो७५ बॅग७५ बॅग
3हरभराफुले विश्वराजसत्यप्रत२४००/-प्रती बॅग ३० किलो बॅग६५ बॅग६५ बॅग
4हरभराफुले विक्रमप्रमाणितरु .२४००/-प्रती बॅग ३० किलो3७३ बॅग३७३ बॅग
5करडईफुले भिवरा (१३ ७१ )सत्यप्रतरु ४०० प्रती ४ किलो४० बॅग४० बॅग
6ज्वारीफुले वसुधासत्यप्रतरु. २४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग१३९७ बॅग१३९७ बॅग
7ज्वारीफुले सुचित्रासत्यप्रतरु. २ ४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग२५० बॅग२५० बॅग
8ज्वारीफुले यशोमतीसत्यप्रतरु.२४० /- प्रती बॅग प्रती ४ किलो बॅग३५० बॅग३५० बॅग

 

भाजीपाला बियाणे उपलब्धता 

अ.क्रपिकवाणबियाणाचे प्रकारदर प्रती ब्यॉगविक्रीसाठी उपलब्ध ब्यॉगक्विंटल
1गवारफुले गवारसत्यप्रतरु ६० प्रति १०० ग्रॅम पॅकेट११५ पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट )११५ पॅकेट (१०० ग्रॅम पॅकेट )
2भोपळाफुले सम्राटसत्यप्रतरु. १४५ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)९५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
3वांगीफुले अर्जुनसत्यप्रतरु. १४५ /- प्रति १०ग्रॅम पॅकेट९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट )९२ पॅकेट (१० ग्रॅम / पॅकेट )
4वांगीफुले हरितसत्यप्रतरु २० प्रति १० ग्रॅम पॅकेट१५० पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट )१५० पॅकेट (१० ग्रॅम पॅकेट )
5मिरचीफुले ज्योतीसत्यप्रतरु १९८ प्रति १०० ग्रॅम पॅकेट१४९ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )१४९ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )
6घोसाळेफुले कोमलसत्यप्रतरु. १२१ /- प्रति १०० ग्रॅम पॅकेट६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)६५ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
7कारलेग्रीनगोल्डसत्यप्रतरु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट१५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)१५८ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट)
8कारलेहिरकणीसत्यप्रतरु. १९४/- प्रति १०० ग्रॅम पॅकेट३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )३२ पॅकेट (१०० ग्रॅम / पॅकेट )

Web Title: Latest News Rabbi Biyane Sale of Rabi season seeds, gram, sorghum, sorghum varieties available 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.