बुलढाणा : शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येणार आहे. रब्बी हंगामातही (Rabbi Season) शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. लवकारच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे Pik Vima Yojana) नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकते प्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असून लवरकच अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची माहिती आहे.
अर्ज कोठे करता येईल?
रब्बी हंगामात पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मुदतीत विमा काढावा. पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरु होईल. pmfby पोर्टल, pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः तसेच बैंक, विमा कंपनी प्रतिनिधी, व सामूहिक सेवा केंद्र यांचे मार्फत अर्ज करता येईल.
उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार
२०२३ पासून सन २०२५-२६ पर्यंत या तीन वर्षांसाठी राज्य शासनाने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना केवळ प्रती अर्ज १ रुपयात नोंदणी करून योजनेत सहभागी होता येणार आहे.
अधिसूचित पिकांचा काढा विमा
पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे. जिल्ह्यात रब्बी गहू बागायती, हरभरा, रब्बी कांदा हे पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के असा जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे.
खरीप हंगामप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ १ रुपयात नोंदणी करून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, रब्बीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी मुदतीत अर्ज करून योजनेत सहभाग घ्यावा.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.