Join us

Nagali Cultivation : नागलीचं क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटलं, नाशिक जिल्ह्यात किती लागवड? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 2:09 PM

Nagali Cultivation : एकट्या नाशिक जिल्ह्यात 28 हजार हेक्टर वर नागलीची लागवड केली जाते. मात्र हे प्रमाण पूर्णतः घटले आहे.

Raga Cultivation : राज्यातील नाशिकसह (Nashik) कोकण कोल्हापूर या विभागात नागलीचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धुळे जळगाव या जिल्ह्यातही काही प्रमाणात नागलीच उत्पादन घेतलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत लागवडीच प्रमाण घटल्याचे पेरणी अहवालावरून दिसून येत आहे. यंदाचा विचार केला तर राज्यात जवळपास 3 हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. 

एकट्या नाशिक जिल्ह्यात 28 हजार हेक्टर वर नागलीची लागवड केली जाते. मात्र हे प्रमाण पूर्णतः घटले आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आदि आदिवासी पट्ट्यात नागलीच क्षेत्र अधिक आहे. या तालुक्यात भात पिकाबरोबर नागली, वरई, खुरासणी आदी पारंपारिक पिके घेतली जातात. मात्र मागील काही वर्षांत ही पारंपरिक पिके दुर्मिळ झाली आहेत. त्यात नागली पिकाचा समावेश आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात 2 हजार 895 हेक्टरवर लागवड झाली आहे. तर हेच प्रमाण मागील वर्षी 3 हजार 215 हेक्टरवर आहे. म्हणजेच त्र्यंबक तालुक्यातच सरासरी 200 हेक्टरवरपेक्षा अधिक प्रमाण घटले आहे. 

राज्यातील नागली लागवडीचा विचार केला असता 2016-17 ते 2020-21 या पाच वर्षांत नागलीच सरासरी क्षेत्र हे 78 हजार 149 हेक्टर होते. तर मागील वर्षाची राज्यातील पेरणी 71 हजार 347 हेक्टरवर होती. यंदा राज्यातील पेरणी 67 हजार 364 हेक्टरवर झाली आहे. त्यानुसार जवळपास 3 हजार हेक्टर क्षेत्रात घट झाली आहे. एकूणच नागलीच्या लागवड क्षेत्रात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. 

नागली, वरई झाले दुर्मिळ 

मागील वर्षे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. या अभिनयांतर्गत देशातील पारंपरिक असलेली पिके ज्यात. नागली, वरई, बाजरी, ज्वारी, राळा इतर भरडधान्ये आहेत, त्यांचे जतन करणे मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे राज्यातील आदिवासी भागात आजही अशा पिकांना देवधान्य असेही म्हटले जाते आणि पीकनिहाय त्यांना विविध भागात तिथल्या स्थानिक नावाने ओळखले जाते. मात्र दुसरीकडे यातील नागलीसह वरई ही पिके दुर्मिळ होत चालल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रपेरणीलागवड, मशागतशेतीनाशिक