Lokmat Agro >शेतशिवार > Rajma Farming : सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांना राजमा पेरणी फायद्याची ठरेल का? वाचा सविस्तर

Rajma Farming : सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांना राजमा पेरणी फायद्याची ठरेल का? वाचा सविस्तर

Latest News Rajma Farming How Rajma will benefit farmers after soybean harvest see details | Rajma Farming : सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांना राजमा पेरणी फायद्याची ठरेल का? वाचा सविस्तर

Rajma Farming : सोयाबीन काढणीनंतर शेतकऱ्यांना राजमा पेरणी फायद्याची ठरेल का? वाचा सविस्तर

Rajma Farming : दर चांगला असल्यामुळे सोयाबीनच्या काढणीनंतर राजमा हे पीक शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते.

Rajma Farming : दर चांगला असल्यामुळे सोयाबीनच्या काढणीनंतर राजमा हे पीक शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची (Kharif Season0 काढणी केलेली आहे. तर रब्बीच्या पेरण्या आता अखेरच्या टप्प्यात आहेत. रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी आणि इतर पिकांची लागवड होते. त्यामध्येच आता राजमा हे पीक खरिपात चांगला नफा देणारे पीक म्हणून घेतले जाऊ लागले आहे. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून आणि थेट शेतात राजमाची (Rajma Sowing) पेरणी करतात. दर चांगला असल्यामुळे सोयाबीनच्याकाढणीनंतर राजमा हे पीक शेतकऱ्यांना फायद्याचे ठरू शकते.

दरम्यान, सोयाबीन काढणीनंतर  (Soyabean Harvesting) अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावे ही शंका असते. राजमा हे पीक ७० ते ८० दिवसांचे असल्यामुळे शेतकऱ्यांना अडीच महिन्यात शेत मोकळे करता येऊ शकते. राजमा हा १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात पेरणी करता येऊ शकते. तर जास्तीत जास्त १५ डिसेंबरपर्यंत राजमाची पेरणी करता येते. सोयाबीन घेतलेल्या शेतात नांगरणी आणि दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या करून राजमाची पेरणी केल्यास उत्तम ठरते.

राजमासाठी १० दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्याची गरज असते. बैलांच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केल्यास गादीवाफे तयार केल्यास पाट पाणी देण्यास सोपे होते. उसामध्ये राजमाचे आंतरपीक घ्यायचे असेल तर दोन सऱ्याच्या मध्ये दोन ओळी टोकन पद्धतीने राजमाची लागवड करू शकतो. ऊस लागवड केल्यानंतर पुढील अडीच महिन्यात राजमा पीक बाहेर निघत असल्यामुळे उसाचा उत्पादन खर्च राजमाच्या आंतपिकातून काढता येऊ शकतो.

पेरणी आणि नियोजन
एका हेक्टरसाठी १०० ते १२५ किलो राजमाचे बियाणे अपेक्षित आहे. बियाणे कमी साईजचे असेल तर १०० किलो प्रतिहेक्टरी बियाणे गरजेचे आहे. तर दोन ओळीतील अंतर हे ३० सेमी आणि दोन रोपातील अंतर हे १५ सेमी एवढे असले पाहिजे. जे शेतकरी राजमाची लागवड करतात अशा शेतकऱ्यांना बियाणांची टोकण पद्धतीने लागवड केल्यास उत्तम ठरते. 

खते
पेरणी करत असताना बियाणांवर बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. पेरणी करताना ३० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि १७० किलो डीएपी प्रतिहेक्टर देणे गरजेचे आहे. 

माहिती संदर्भ - कृषीविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे.

Web Title: Latest News Rajma Farming How Rajma will benefit farmers after soybean harvest see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.