Lokmat Agro >शेतशिवार > Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी? 

Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी? 

Latest News Ration Card e KYC know how to do e-KYC related to ration card through simple steps | Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी? 

Ration Card e KYC : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी? 

Ration Card e KYC : रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात... 

Ration Card e KYC : रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात... 

शेअर :

Join us
Join usNext

Ration Card e KYC : आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्ड बाबत देखील ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात... 

प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आताई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड (ration Card) धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशन दुकानात जाऊन.. 

  • रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.
  • या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.
  • यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
  • यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. 

 

मेरा राशन या अँपच्या मदतीने.... 

  • सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अँप डाऊनलोड करा
  • त्यानंतर अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.
  • आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा. 
  • त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे. 
  • त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल. 
  • ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल. 
  • ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.    

 

Ration card : रेशनकार्ड धारकांनो! ई-केवायसी कराच, अन्यथा धान्य मिळणारच नाही, वाचा सविस्तर

Web Title: Latest News Ration Card e KYC know how to do e-KYC related to ration card through simple steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.