- सुनील चरपेनागपूर : हवामानातील बदल विचारात घेता नागपूर जिल्ह्यातील (Nagpur) ‘क्राॅप पॅटर्न’मध्ये मागील पाच वर्षांत फारसा बदल झाला नाही. ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. त्यांच्या या उदासीनतेला याच शेतमालाचे (Market Yard) बाजारभाव जबाबदार असल्याचेही स्पष्ट हाेते. बहुतांश शेतकरी शेती क्षेत्रातील वैज्ञानिक बाबी गांभीर्याने घेत नसल्याचेही आढळून आले आहे.
नागपूर जिल्ह्यात सामान्यत: कापूस, साेयाबीन, धान व तुरीचे पीक (Tur Crop) माेठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकांच्या पेरणीक्षेत्रात दरवर्षी किमान ५ हजार ते १० हजार हेक्टरचा चढ-उतार असताे. जिल्ह्यात साधारणत: २ लाख २० हजार हेक्टरमध्ये कपाशी, प्रत्येकी ९५ हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी (Soyabean Sowing) व धानाची राेवणी केली जाते. जिल्ह्यात संत्रा आणि माेसंबीच्या बागांचे क्षेत्र अनुक्रमे २५ हजार व १८ हजार हेक्टर आहे.
चार वर्षांत साेयाबीनच्या क्षेत्रात घट१) २०२०-२१ - १,०२,३८७ हेक्टर२) २०२१-२२ - ९२,७७० हेक्टर३) २०२२-२३ - ८३,४१२ हेक्टर४) २०२३-२४ - ८६,४७१ हेक्टर
प्रमुख पिकांचे पेरणीक्षेत्र१) कापूस- २,२१, १२१ हेक्टर२) धान- ९३,६६९ हेक्टर३) साेयाबीन- ८६,४७१ हेक्टर४) तूर- ५६,६८५ हेक्टर५) कडधान्य- ५७,२४७ हेक्टर
अशी आहे आपली मातीपिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचा सामू (पीएच) हा उदासीन म्हणजेच ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मातीचा सामू अति आम्ल किंवा अति विम्ल असल्यास त्याचा पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम हाेताे. कारण या असंतुलित सामूमुळे पिकांना जमिनीसाेबत खतांद्वारे दिले जाणारे मूलभूत व सूक्ष्म अन्नद्रव्य मिळणे कठीण जाते. जिल्ह्यातील मातीचा सामू सध्यातरी संतुलित आहे, अशी माहिती माती परीक्षण अधिकारी दीक्षिता तीरमारे यांनी दिली....ज्वारीचा पेरा वाढेनाएकेकाळी नागपूर जिल्ह्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र किमान ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक हाेते. मात्र, त्या काळात ज्वारीला फारसा भाव मिळत नव्हता. त्यातच काळाच्या ओघात गुरांची संख्या कमी हाेत मजुरांची टंचाई जाणवायला लागली. याचा परिणाम ज्वारीच्या पेरणी क्षेत्रावर झाला. जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये २,७७९ हेक्टर, २०२१-२२ मध्ये १,८४७ हेक्टर, २०२२-२३ मध्ये ९१५ हेक्टर आणि २०२३-२४ मध्ये ८३७ हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी केली हाेती.
हवामान बदलाचे नवे संकटहवामान बदलामुळे शेती क्षेत्रावर नवीन संकट निर्माण झाले आहे. पूर्वी राेहिणी व मृग नक्षत्रात पेरणी केली जायची. मागील काही वर्षांपासून ही दाेन्ही नक्षत्रे काेरडी जायला लागली. त्यातच किमान ७० ते १०० मिमी पाऊस काेसळल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी आवाहन केले जाते. शेतकरी मात्र त्यांच्या राेहिणी व मृगातील पेरणीची मानसिकता साेडायला तयार नाही. शेतकऱ्यांची मानसिकता व पावसाची अनियमितता यामुळे दुबार पेरणीचे प्रमाणही वाढत आहे.
पावसाची अनियमितता वाढल्याने पेरणी करण्यास विलंब हाेताे. उशिरा पेरणी केल्यास पीक कापणीच्या वेळी परतीच्या व अवकाळी पावसाचा धाेका असताे. हवामान खात्याचेही अंदाजही खरे ठरतातच असे नाही. त्यामुळे नेहमीच फसगत हाेते.- रामभाऊ सेंबेकर, शेतकरी, मेंढला.
हवामानातील बदलामुळे राेग व किडींचे प्रमाण वाढले आहे. त्यांचे व्यवस्थापन करावयाचे झाले तर पिकांचा उत्पादन खर्च वाढताे. न केल्यास नुकसान हाेते. त्यातच दरही समाधानकारक मिळत नाही, तसेच सरकार राेग व कीड प्रतिबंधक बियाणे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत नाही.- अनिल माेवाडे, शेतकरी, सावनेर.