अकोला : अमेरिका, ब्राझील, दिल्ली, मुंबई व मेट्रो शहराप्रमाणे नाविन्यपूर्ण ग्रेप्स फ्रूट्स म्हणजेच लाल-गुलाबी मोसंबी (Grape Fruit) आता विदर्भातील अकोल्यातही उपलब्ध होणार आहे. अकोल्यातील शेतकऱ्याने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात जवळपास पाचशे झाडांची लागवड केली आहे.
विदर्भातील शेतकरी फळबाग शेतीकडे वळू लागले आहेत. यात पारंपरिक फळपिकांसह फळपिकांत नवे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या झाडांना आतापर्यंत कुठलेही रासायनिक खत अथवा औषधीचा वापर केला नसून, सेंद्रिय पद्धतीने कंपोस्ट खत, कुजवलेले शेणखत, जीवामृत, गोकृपाअमृत, कलकी रसायन याचा जमिनीतून ड्रिप सिस्टम, फवारणीद्वारे वापर करण्यात आला, त्यामुळे झाडांची व फळांची गुणवत्ता आहे. अकोला येथील शेतकरी युवराज कदम यांनी बुलडाणा जिल्ह्यातील लोणी-कदमापूर या गावात सेंद्रिय शेती पद्धतीने ५०० झाडांची लागवड करून उत्पादन घेत आहे. लाल -गुलाबी मोसंबी हि आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्यासाठी उत्तम असून हे फळाची आंबट, तुरट, कळवट अशी असते.
प्रक्रिया उद्योगाकरिता उत्तम
विदर्भात या फळांची यशस्वीरीत्या लागवड होऊ शकत असल्याने प्रक्रिया उद्योगाकरिता ही फळे अत्यंत उपयुक्त आहेत. फळाच्या रसाला अॅथोसायनिंगमुळे येणारा गुलाबी-लाल रंग रसाचे आकर्षण वाढवतो, असा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या लिंबूवर्गीय फळशास्त्र विभागाचे डॉ. दिनेश पैठणकर यांनी केला आहे.
लाल मोसंबी आरोग्यदायी
लाल मोसंबी एका फळ आरोग्यासाठी उत्तम असल्याचा दावा लिंबुवर्गीय शास्त्रज्ञांनी केला आहे. या लाल मोसंबी खाण्याचे फायदे म्हणजे, त्वचा व संपुर्ण आरोग्य सुदृढ राहते, हृदयविकारावर नियंत्रण ठेवते, कर्करोग, रक्तदाब, मधूमेह यामुळे नियंत्रीत कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते, वजन कमी करण्यास मदत होते, असे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत.