Lokmat Agro >शेतशिवार > Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन 

Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन 

Latest News Registration of Exportable grape farming Begins, Nashik Farmers Called for Registration  | Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन 

Grape Farming : निर्यातक्षम द्राक्षबागांच्या नोंदणीला सुरवात, नाशिकच्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवाहन 

Grape Farming : २०२४-२५ या हंगामात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Grape Farming : २०२४-२५ या हंगामात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक  : २०२४-२५ या हंगामात निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी (Grape Farming) सुरू करण्यात आली आहे. युरोपियन युनियन व इतर देशांमध्ये नाशिक पट्ट्यातून दरवर्षी द्राक्ष निर्यात होत असतात. 'अपेडा'च्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येईल. यंदा किमान ३० हजारांहून बांगांच्या नोंदणीची विभागाला आहे. 

राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा (Nashik) अग्रेसर असून सन २०२३-२४ मध्ये २८४६० निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली होती. सन २०२४-२५ वर्षामध्ये फळे व भाजीपाला निर्यातीस चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत खास उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी मोबाइल अॅपचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.

द्राक्ष निर्यातीला देण्यासाठी राज्यात चालना निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी रोगमुक्त हमी, अंगमार्क फायटोसॅनिटरी , किड व प्रमाणीकरण, प्रमाणीकरण या सर्व बाबींचे ग्रेपनेट प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.निर्यातीबरोबरच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना किड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्याला या वर्षी ४४००० द्राक्ष बागांच्या नोंदणीचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. 

नोंदणीसाठी इथं साधा संपर्क 

दरम्यान निर्यातक्षम द्राक्ष बागांची अपेडाच्या (APEDA) ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीवर १ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. त्यानुसार अधिकाधिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी बागांची नोंद करावी. यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी केले आहे.
 

Web Title: Latest News Registration of Exportable grape farming Begins, Nashik Farmers Called for Registration 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.