Join us

Nashik Farmers : नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँक कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 6:48 PM

NDCC Bank :

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँक कर्ज (Nashik District Bank) घेतलेल्या व सध्या सक्तीची कर्ज वसुली सुरु असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सक्तीचे कर्ज वसुली शेतकऱ्यांवर होणारे कारवाई तात्काळ थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काही अंशी का होईना, यश आले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Nashik bank Loan) कारभारात सुधारणा करण्यासाठी जिल्हाधिकारी जलल शर्मा (Nashik Collector Jalaj Sharma) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक , उपायुक्त सहकार विभाग पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, प्रशासक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकनाशिक यांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने कमिटी स्थापन केली आहे. कमिटी स्थापन केल्यानंतर पहिलीच बैठक जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक येथे घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी 'थकबाकीचे सर्व कर्ज माफ करावे, सातबारा कोरा करावा, बँकेने सक्तीची वसुली बंद करावी, वृत्तपत्रात रोज देण्यात येणाऱ्या लिलावाच्या नोटीसा तात्काळ बंद कराव्यात, शासन  निर्णय घेईल, तोपर्यंत बँकेने शेतकऱ्यांचे कोणते थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ नये, अशा मागण्या करण्यात आल्या. यावर सकारात्मक चर्चा होऊन दीड तास बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. 

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन जिल्हाधिकारी व प्रशासक यांना देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी उद्यापासून सक्तीची वसुली करण्यासंदर्भात वृत्तपत्रात कोणतीही जाहिरात देण्यात येऊ नये, शेतकऱ्यांना त्रास देण्यात येऊ नये अशा पद्धतीचे आदेश बैठकीमध्ये देण्यात आले. त्यावर प्रशासक यांनी यापुढे असे कार्यवाही करण्यात येणार नाही असे सांगितले. 

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.... 

नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुलीसाठी जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिलेली आहे. मात्र आंदोलन 26 सप्टेंबरचा जिल्हाधिकारी कार्यालय घेराव आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धरणे आंदोलन, जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत सुरूच राहील, असे स्पष्टीकरण शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिले. 

टॅग्स :नाशिकशेती क्षेत्रनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयशेतकरी