Join us

Research Grape Diseases : द्राक्ष रोगांचे अचूक निदान करणारे संशोधन, नेमकं काय आहे संशोधनाचे स्वरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:25 IST

Research Grape Diseases : द्राक्षांवरील विविध रोगांमुळे Grape Farming Disease) येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

नाशिक : आयओटी आणि मशीन लर्निंगच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने द्राक्ष रोगांचे अचूक पूर्वानुमान (Research Grape Diseases) आणि मूल्यांकन करून द्राक्षांवरील रोगांचे प्रारंभिक निदान करण्यासह शेतकऱ्यांना वेळेवर उपचार करण्याची संधी व त्यातून उत्पादनात वाढ करण्याची प्रक्रिया व संशोधन एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. अपेक्षा गावंडे यांनी केले आहे. या संशोधनाची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाने त्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली आहे.

मशीन लर्निंग आधारित द्राक्ष रोगांचे (Grape Farming Diseases) पूर्वानुमान तसेच त्याचे मूल्यांकन या महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे; मात्र द्राक्षांवरील विविध रोगांमुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

प्रा. गावंडे यांनी आयओटी आणि मशीन लर्निंगच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने द्राक्ष रोगांचे अचूक पूर्वानुमान आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया विकसित केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर उपचार करण्याची संधी मिळते व उत्पादनात वाढ होते, असे संशोधनाचे स्वरूप आहे.

रोगांचे प्रारंभिक निदानआयओटी सेन्सर्सच्या मदतीने द्राक्ष झाडांवरील तापमान, आर्द्रता, मातीची गुणवत्ता आदी विविध मापदंड गोळा केले जातात. त्यानंतर, मशीन लर्निंगच्या साहाय्याने या माहितीचे विश्लेषण करून द्राक्षांवरील रोगांचे प्रारंभिक निदान करता येते.

संशोधनाची दखल...संशोधनाची दखल घेऊन प्रा. गावंडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. त्यांचे हे संशोधन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राच्या संचालिका व विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्त्या प्रा. डॉ. स्वाती शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या संशोधनाच्या आधारे पाच संशोधन लेख प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. 

टॅग्स :द्राक्षेशेती क्षेत्रशेतीकृषी योजना