Lokmat Agro >शेतशिवार > Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर 

Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Rojgar Hami Yojna Central government has paid 893 crores to MNREGA laborers in maharashtra know in detail  | Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर 

Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर 

Rojgar Hami Yojna : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम केलेल्या मजुरांना अनेक महिन्यापासून रोजंदारीचे पैसे मिळालेले नाहीत.

Rojgar Hami Yojna : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम केलेल्या मजुरांना अनेक महिन्यापासून रोजंदारीचे पैसे मिळालेले नाहीत.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MANREGA) काम केलेल्या मजुरांना २८ जुलैपासून रोजंदारीचे पैसे मिळालेले नाहीत. राज्य शासनाने नाशिकमधीलकामगारांचे सुमारे ३ कोटी थकविलेले असताना महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील ३७ हजार १४९ कामांचे ८९३ कोटी ६४ लाख रुपये केंद्र सरकारकडे थकीत आहेत. त्यामुळे पाच लाख ५८ हजार ६४८ मजूर अडचणीत आहेत. 

नाशिक जिल्ह्यात (Nashik) रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून (Rojgar Hami Yojna) एक हजार ३१ ठिकाणी ४ हजार ३५६ कुशल मजूर काम करत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून शेतीकामांमुळे रोजगार हमीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. असे चित्र असताना दुसरीकडे उपलब्ध मजुरांना जुलैपासूनचे वेतनही मिळालेले नाही. साधारणतः दोन ते अडीच महिन्यांचे एकत्रित वेतन दीड कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. याव्यतिरिक्त इतर कामांचे एक ते दीड, असे एकूण तीन कोटी रुपये शासनाकडे थकलेले असून, त्याचा विपरीत परिणाम योजनेवर होतो आहे. 

रोजगार हमीच्या माध्यमातून ६०-४० या प्रमाणात अनुक्रमे कुशल (स्किल्ड) व अकुशल (अनस्किल्ड) या स्वरूपात २६२ विविध प्रकारची कामे केली जातात. त्यासाठी मजुरांना प्रतिदिन नाशिक २७३ रुपये मजुरी दिली जाते. त्यात वाढ करण्यात आल्यानंतरही राज्यात मजुरांची वानवा भासत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खासगी ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना ४०० ते ५०० रुपये सुरगाणा मजुरी मिळते. या तुलनेत शासनाची मजुरी कमी तर आहेच, याशिवाय वेळेवर पैसेही मिळत नाहीत.

मजुरांना खासगी ठिकाणी कामाचे पैसे मिळत असल्याने तिकडेच मजुरांचा जास्त कल असतो. पावसाळ्यात शेतीकामे सुरू झाल्यामुळेही रोजगार हमीच्या कामांवर परिणाम झाला आहे. रोखता नियमानुसार पैसे मिळण्याकडे कामगारांचा कॉल असतो.
- सुरेखा पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो 

तालुका निहाय कामांची स्थिती

तालुका निहाय कामांची स्थिती पाहिली असता बागलाण तालुक्यात 93 चालू कामे आणि 269 मजूर उपस्थिती, चांदवड तालुक्यात 42 तालुकामे 280 मजुरांची उपस्थिती, देवळा तालुक्यात 123 चालू कामे तर 510 मजुरांची उपस्थिती, दिंडोरी तालुक्यात 88 चालू कामे तर 285 मजुरांची उपस्थिती, इगतपुरी तालुक्यात 05 चालू कामे तर 75 मजुरांची उपस्थिती, कळवण तालुक्यात 53 चालू कामे, तर 224 मजुरांची उपस्थिती, मालेगाव तालुक्यात 113 कामे आणि 755 मजुरांची उपस्थिती, नांदगाव तालुक्यात 51 चालुकामे आणि 27 मजुरांची उपस्थिती,

नाशिक तालुक्यात 41 चालु कामे 183 मजुरांची उपस्थिती, निफाड तालुक्यात 93 तालुका मे आणि 380 मजुरांची उपस्थिती, पेठ तालुक्यात 13 चालू कामे आणि 61 मजुरांची उपस्थिती, सिन्नर तालुक्यात 160 कामे आणि 569 मजुरांची उपस्थिती, सुरगाणा तालुक्यात 09 नऊ तालुका आणि 65 मजुरांची उपस्थिती, त्र्यंबकेश्वर तालुक्यात 28 चालू कामे,  87 मजुरांची उपस्थिती, येवला तालुक्यात 119 चालू काम आणि 366 मजुरांची उपस्थिती अशा पद्धतीने जिल्ह्यात 10031 चालू कामे असून 04 हजार 356 मजूर रोजगार हमीच्या कामावर उपस्थित आहेत.

Web Title: Latest News Rojgar Hami Yojna Central government has paid 893 crores to MNREGA laborers in maharashtra know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.