Lokmat Agro >शेतशिवार > Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी!

Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी!

Latest News Seed Bank' started at ten places in Buldhana district, read the detailed list | Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी!

Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी!

Seed bank : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दुर्मीळ झाडांच्या बियांची पेढी अर्थात "सीडबैंक" उघडण्यात आली आहे.

Seed bank : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दुर्मीळ झाडांच्या बियांची पेढी अर्थात "सीडबैंक" उघडण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बुलढाणा : पर्यावरणाचा (environment) दिवसागणिक होणारा हास टाळण्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन अंत्यतिक गरजेचे आहे. यानुषंगाने पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दुर्मीळ व लुप्त होत चाललेल्या वनस्पती व वृक्षांची लागवड आणि संगोपनासाठी 'पर्यावरण गतिविधी' या संस्थेने पुढाकार घेत बुलढाणा (Buldhana) ठिकठिकाणी 'सीडबँके'ची स्थापना केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत पूर्वी आढळणाऱ्या दुर्मीळ वनस्पती व वृक्षांची घटती संख्या पाहता त्यांचे योग्य संवर्धन व्हावे, पुढच्या अनेक पिढ्यांना या वनस्पती व वृक्षांचा लाभ मिळावा, या हेतूने 'पर्यावरण गतिविधी' या पर्यावरणप्रेमी संस्थेकडून जिल्ह्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दुर्मीळ झाडांच्या बियांची पेढी अर्थात "सीडबैंक" (Seed bank) उघडण्यात आली आहे. ज्या नागरिकांकडे अशा दुर्मीळ वनस्पती व वृक्षांची बीज, बिया उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून त्या संकलित करून त्यांची लागवड या माध्यमातून केली जाईल. पावसाळ्याच्या तोंडावर ही सीडबॅक सध्या महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असून ही एक लोकचळवळ होण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागरिकांचा सहभाग आवश्यक

नागरिकांनी प्रामुख्याने त्यांच्याकडे उपलब्ध दुर्मीळ वनस्पती व वृक्षांचे बीज नजीकच्या सीड बँके'त जमा करावे, त्याची योग्य ठिकाणी लागवड करून त्याचे संगोपन करणार असल्याची माहिती पर्यावरण गतिविधीचे विभाग संयोजक ओमप्रकाश गोंधने व जिल्हा संयोजक उमेश जपे यांनी दिली आहे.

८० प्रकारच्या बियाण्यांचे संकलन

पर्यावरण गतिविधीत सहभागी सुमारे ४५ जणांकडून प्रामुख्याने 'पेड, पाणी आणि पॉलिथीन' या तीन घटकांसाठी काम केले जाते. यासह 'हरित घर' अंतर्गत घरोघरी जनजागृती केली जात आहे. दरम्यान 'सीडबॅक' उपक्रमाअंतर्गत आजवर विविध ८० प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती व वृक्ष बीजांचे संकलन केले आहे.

कुठे-कुठे आहेत 'सीड-बँक'?

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, जानफेळ, लोणार, उदयनगर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, जयभवानी जगदंबा उत्सव मंडळ संभाजीनगर चिखली, स्टुडन्ट गॅलरी सुलतानपूर येथे या सीडबँक आहेत.

Web Title: Latest News Seed Bank' started at ten places in Buldhana district, read the detailed list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.