Sericulture Training : रेशीम कोष व तुती व्यवसायाचे विनामूल्य प्रशिक्षण (Sericulture Training) सर्व शेतकरी बांधवांसाठी व शेतीला जोडधंदा करू इच्छिणाऱ्या व रेशीम उद्योगास (Sericulture Farming) चालना देण्यासाठी ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेटी), तळेगाव दाभाडे, पुणे आयोजित रेशीम कोष व तुती लागवडीचे १० दिवसीय प्रशिक्षण लवकरच चालू होणार असून नाव नोंदणी चालू आहे.
प्रशिक्षण हे विनामूल्य असून (Free Training Programme) प्रशिक्षणादरम्यान रहिवास, चहा, नाश्ता, भोजन, प्रशिक्षण साहित्य, प्रकल्प अहवाल व बँकेविषयी माहिती, विविध योजना व अनुदान, तसेच रेशीम व्यवसायास प्रात्यक्षिक भेट याचा अंतर्भाव असेल. तर चला या प्रशिक्षणामध्ये भाग घेऊन आपण आपल्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करूया, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान प्रशिक्षणासाठी जागा या मर्यादित असून 18 ते 44 या वयोगटातील अर्जदारांनी संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर भारत सरकारच्या स्किल इंडिया (Skill India) व एन. सी. व्ही. टी (NCVT DELHI) मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 7218612457 या नंबरवर संपर्क साधा.
नियम व अटी, कागदपत्रे
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी,
- ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य
- बॅच संख्या 35
- वय वर्ष 18 ते 44
- कागदपत्रे : आधार कार्ड, 3 फोटो