Join us

Small Business Tips : उद्योग सुरु करताय? 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:49 IST

Small Business Tips : स्टार्टअप सुरू करणे आव्हानात्मक असले तरी नियोजन व कष्टाच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

Small Business Tips : सध्या अनेकजण नोकरी सोडून स्वतःच काहीतरी उद्योग सुरू (Start Up) करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टार्टअप सुरू करणे आव्हानात्मक असले तरी नियोजन व कष्टाच्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. त्यामुळे सुरवातीला कमी भांडवलावर देखील काही छोटे उद्योग (Small Business Tips) सुरु करता येतील. त्यासाठी योग्य नियोजन महत्वाचे ठरणार आहे. 

मार्केटमध्ये उतरताना 

  • स्टार्टअप तयार करत असताना तिचे वेगळेपण कायम जाणवायला हवे, याचा विचार करा. 
  • विशिष्ट सेवा किंवा उत्पादन ग्राहकांसाठी सोपे, परवडणारे कसे बनवता येईल? याचा विचार करून स्टार्ट अप उघडा. 
  • तुम्ही जो व्यवसाय करणार आहात, त्याला बाजारात मागणी आहे का, याचा अभ्यास करा. 
  • व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी कोण आणि त्यांच्याकडे काय वैशिष्ट्य आहेत, हे समजून घ्या. 

 

व्यवसाय काय करायचा हे ठरवा.. तुम्ही काय विकणार आहात?, उत्पन्न कुठून येणार आहे? तुमचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत? उत्पादनाची जाहिरात कशी करणार? याचा प्रारंभीच विचार करा. तुमचे उत्पादन किंवा सेवा सुरुवातीला फक्त प्राथमिक स्वरूपात बाजारात येऊद्या, त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिसादावर त्यात बदल करा. 

आर्थिक नियोजन महत्वाचे 

  • सुरुवातीचे भांडवल स्वतःच्या बचतीतून उभे करा. 
  • यानंतर गुंतवणूकदार शोधा. 
  • केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, मुद्रा लोन अशा अनेक योजना आहेत. त्या योजनांचा फायदा घ्या.
टॅग्स :व्यवसायशेती क्षेत्रशेतीशेतकरी