Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजनेत (Magel Tyala Solar Pump Yojana) अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेमेंट करून वेंडर निवड केली आहे. अनेकांचे जॉईंट सर्वे झाले आहेत. आता मात्र शेतकरी अनेक दिवसांपासून सोलर पंप बसविण्याची वाट पाहत आहेत. मात्र अनेक महिने होऊनही, काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अशावेळी सोलर कंपनी (Solar Vendor Selection) बदलता येते का? तर हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून पाहूयात...
गेल्या वर्षभरापासून मागील त्याला सोलर पंप योजनेच्या (Solar Pump Scheme) माध्यमातून प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी सुरुवातीला मागेल त्याला सोलर पंप योजनेत सहभागी होत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. त्याचबरोबर पेमेंट प्रक्रिया असेल वेंडर निवडीची प्रक्रिया असेल किंवा त्यानंतर शेतकरी पात्र झाल्यानंतरची जॉईन सर्वेची प्रक्रिया असेल, अशा सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर शेतकरी सोलर पंप बसवण्यास दिरंगाई होत आहे.
आता या योजनेत अनेक कंपन्या समाविष्ट असल्याने शेतकऱ्यांनी सोईस्कर असलेल्या कंपन्या निवडल्या आहेत. या कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यात येणार आहेत. यातील काही पात्र शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंपही बसवण्यात आले आहेत. मात्र बहुतांश शेतकरी यापासून वंचित असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांनी निवडलेल्या कंपन्यांकडून अद्यापही नीटसा प्रतिसाद नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण योजनेत असलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. आता केवळ सोलर पंप बसवण्याचे काम शिल्लक आहे. मात्र याकडे कंपन्या कानाडोळा करत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे होऊन दोन महिने झाले आहेत. काही शेतकऱ्यांचे तीन महिने झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे सहा-सहा महिने झाले आहेत. तरीदेखील अद्याप सोलर पंप बसवण्यात आले नसल्याचे पाहायला मिळते आहे.
शासनाचा जीआर काय म्हणतो? शासन निर्णयानुसार शेतकऱ्याने एखादी कंपनी निवडल्यानंतर पुढील 60 दिवसात वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सोलर पंप बसविण्यात यावा. मात्र असे होताना दिसत नाहीये. अशावेळी शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की 60 दिवसानंतर आपल्याला कंपनी बदलता येईल मात्र याबाबतही शेतकऱ्यांनी महावितरणकडे विचारणा केली. याबाबत ठोस उत्तर मिळू शकले नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
मग तक्रार कुठे करावी? तर मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेत महावितरण सहभागी असल्याने येथील कार्यालयातील काही नंबर दिले आहेत यात राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 1912 आणि 19120 तसेच महावितरण टोल फ्री क्रमांक 1800 212 3435 आणि 1800 233 3435 यावर संपर्क करून आपण तक्रार नोंदवू शकता किंवा विचारणा करू शकता.