Join us

Seedballs Sowing : 100 हेक्टर माळरानावर ड्रोनच्या साहाय्याने सीडबॉल्स पेरणी, नाशिक तालुक्यात प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 4:05 PM

Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) 100 हेक्टर माळरानावर प्रगत ड्रोन तंत्रज्ञान वापरुन सिडबॉल्स पेरणीचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिक : जिल्हा प्रशासन आणि नाशिक वनविभाग (Nashik Forest) यांच्या सहकार्याने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने नाशिक जिल्ह्यातील (Nashik) १०० हेक्टर माळरानावर प्रगत ड्रोन तंत्रज्ञान वापरुन सिडबॉल्स पेरणीचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक तालुक्यातील गंगा म्हाळुंगी गावातील डोंगरावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रयोग झाला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीने (Bharat Petroliam) आपल्या सीएसआर निधीतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) नाशिक परिक्षेत्र, हिवरे बिलगे आणि गंगा म्हाळुंगी गाव या तीन वन परिक्षेत्रातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात १०० हेक्टर खराब जमिनी आहेत. डोंगराळ असलेल्या या भागात माणूस तेथे जाऊ शकत नाही. अशा १०० हेक्टर क्षेत्रावर प्रगत ड्रोन तंत्रज्ञान (Drone) वापरून बीपीसीएल कंपनीने सिडबॉल्सच्या माध्यमातून दोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था, जिल्ह्याचे प्रशासन सांभाळताना काही सामाजिक उपक्रमांना देखील सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणे गरजेचे असते. बीपीसीएल कंपनीने सामाजिक उपक्रमातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी सामूहिक हातभार महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचे संरक्षण, जतन करणे आपले कर्तव्य आहे.- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

जागेची निवड करताना जीआयएस मॅपिंग वापरण्यात आले. स्थानिक नागरिक, सिडबॉलचे उत्पादन आणि ड्रोनचा वापर यासह सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले आहे. याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला रोल मॉडेल (पथदर्शक) ठरणार आहे.- पंकज गर्ग, उपवनसंरक्षक, नाशिक

टॅग्स :पेरणीनाशिकशेती क्षेत्रशेती