यवतमाळ : सोयाबीनकाढणीचा (Soyabean) हंगाम सुरू झाला आहे. याचवेळी गावात सोयाबीनकाढणीला (Soyabean Harvesting) मजूर मिळणे अवघड झाले आहे. सोयाबीनचे हार्वेस्टिंग महागले आहे. साधारण २८०० रुपयांची बियाणे बॅग काढणी करताना मजूरवर्गच तीन हजार रुपये बॅगपर्यंत दर मागत आहे. तर एकरी पाच हजार रुपयांची मागणी मजूर वर्गाकडून होत आहे. बाजारात क्विंटलला ५ हजार रुपयांचा दर देखील मिळत नसताना काढणीला अधिकच खर्च येत असल्याचे चित्र आहे.
सध्या सोयाबीनला काढणीला वेग आला असून काही भागात पावसाने (Rain) सोयाबीन पिकाची दाणदाण उडवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सोयाबीन काढणीची लगबग सुरु आहे. अशा स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजुरी दर परवडणारा नसल्याने शेतकऱ्याने चिंतेत आहेत. त्यात भाव नसल्याने मशीनद्वारे सोयाबीन काढणी देखील जिकिरीची झाली आहे. विशेष म्हणजे यातून निघणारा उतारा रामभरोसे आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान मिळालेला दर ३,४०० खुल्या बाजारात सोयाबीनला तीन हजार ४०० रुपये विचेटलचा दर मिळत आहे. सोयाबीला तीन-चार क्विंटलचाही उतारा आला आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या हातात १३ हजार ६०० रुपये एकरी उत्पन्न हाती येत आहे. शेतीचा एकरी खर्च ३५ हजार ६०० रुपयांचा आहे, तर मिळालेले उत्पन्न पाहता सोयाबीन उत्पादकांना एकरी २२ हजार रुपये घाटा आहे.
एकरी खर्च किती येतो तर....
एकरी खर्च किती येतो तर पेरणीपूर्व मशागत ९ हजार ५०० हजार रुपये, बी बियाणे ४ हजार ५०० रुपये, फवारणी ०९ हजार रुपये, काढणी ०३ ते ०४ हजार रुपये, इतर १० हजार रुपये असा एकूण २६ हजार ते २७ हजार रुपये खर्च येतो. त्यात सद्यस्थितीती सोयाबीनला क्विंटलमागे ४ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. त्यातही एमएसपी पेक्षा कमीच दर असल्याचे शेतकरी चिंतेत आहेत.