Lokmat Agro >शेतशिवार > Soyabean Moisture : कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनबाबत महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर 

Soyabean Moisture : कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनबाबत महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर 

Latest News Soyabean Moisture Soyabean Important appeal regarding low moisture and FAQ quality soybeans, read in detail  | Soyabean Moisture : कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनबाबत महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर 

Soyabean Moisture : कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनबाबत महत्वाचं आवाहन, वाचा सविस्तर 

Soyabean Moisture : सोयाबीन हमीभावाच्या (Soyabean MSP) मार्गात आर्द्रतेचा खोडा असून खासगी बाजारात कमी दर (soyabean Market देत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. 

Soyabean Moisture : सोयाबीन हमीभावाच्या (Soyabean MSP) मार्गात आर्द्रतेचा खोडा असून खासगी बाजारात कमी दर (soyabean Market देत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली : सोयाबीन आर्द्रता मोजण्यासाठी खरेदी केंद्रावर जे शेतकरी सोयाबीनचे नमुने घेऊन येतील त्यांना तात्काळ मॉईश्चर (Soyabean Moisture) तपासून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी सर्व खरेदी संस्थांना केले आहे. मात्र सोयाबीन हमीभावाच्या मार्गात आर्द्रतेचा खोडा असून खासगी बाजारात कमी दर देत शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. 

अनेक दिवसांपासून सोयाबीनला समाधानकारक (Soyabean Market) दर मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. अशातच सोयाबीन आद्रतेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 

तसेच गावोगावी आपल्या कर्मचाऱ्यांना आर्द्रतामापक यंत्रासह पाठवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सोयाबीन शेतमालाचे (soyabean Bajarbhav) प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. तसेच 12 टक्के मॉईश्चर (Soyabean Moisture) पेक्षा कमी आर्द्रता असलेले व एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच खरेदी केंद्रावर विक्रीस आणावेत, यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करावेत. तसेच त्यांना सोबत माहितीपत्रकही वाटप करावेत, असे आवाहन सर्व खरेदी संस्थांना करण्यात आले आहे. 

माॅइश्चर किमान १२ ही अट खोडाच

शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन हे एफएक्यू दर्जाचे खरेदी करावे, असा दंडक आहे. यानुसार काडी, कचरा, माती अशा बाबी प्रतवारीच्या कसोटीवर पारखून घेतल्या जाणार असल्या तरी निकषातील माॅइश्चर किमान १२ असावे, ही अट आहे. एकूणच शासकीय सोयाबीन हमीभाव खरेदीत ही अट खोडा घालणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने सोयाबीनला साल २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रतिक्विंटलला चार हजार ८९२ असा हमीभाव निश्चित केला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात बाजारपेठेत तीन हजार ६०० ते चार हजार २०० असा प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी लुटला जात आहे.

Web Title: Latest News Soyabean Moisture Soyabean Important appeal regarding low moisture and FAQ quality soybeans, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.