Join us

अवकाळीनंतर असं करा पिकांचं व्यवस्थापन, मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सल्ला 

By गोकुळ पवार | Published: December 02, 2023 1:17 PM

अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Crop Damage :  पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून पिकांवर आलेल्या समस्यांवर उपाययोजना सांगण्यात आले आहेत. 

तूर आणि कापूस पिकासाठी 

तुर पिकावर आलेल्या फुलगळ व चट्टेगळ या रोगांवर एन.ए. ए मिली तसेच 10 मिली बोरॉन प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर शेंग पोखरणारी अळी व फायटापथेरा मर रोगांवर इमामेकटीन बेन्झोएट 5 टक्के 4.4 ग्रॅम सोबत मेंटलक्सिलसह मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी. कापूस पिकावर आलेल्या बोंडसड आली असल्यास यावर उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आणि गुलाबी बोंड आळीवर थायमिथॉक्झाम 12.6 टक्के सोबत लॅमडा साय हलोथ्रीन 9.5 टक्के 5 मिली पाण्यात किंवा सायपरमेथ्रीन (25 ईसी) मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा पिकांसाठी 

हरभरा पिकावर मर रोग आल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ट्रायकोडमा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात जमिनीवर फवारणी करावी किंवा आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल 70 डब्ल्यू पी 25 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच घाटे अळी दिसत असल्यास शेतात प्रति एकरी दोन काम गंध सापळे व 10 पक्षी थांबे उभारावेत. तसेच रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंजोएट पाच टक्के 4.4 ग्रॅम किंवा फ्युबेंडामाईड 39.35 एससी तीन मिली लिटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ज्वारीसाठी काय कराल? 

तसेच रब्बी ज्वारीच्या पिकावर देखील ज्वारी लोळणे असा प्रकार दिसून आल्यास ज्वारीचे पीक तीस दिवसांपर्यंत आडवे पडले असल्यास पंधरा दिवसात उभे राहते पीक उभे राहिल्यानंतर 35 किलो युरियाची मात्रा देऊन कोळपणी द्वारे ज्वारीच्या ताटाला माती लावून घ्यावी. तसेच सदस्याचे रब्बी ज्वारीची पेरणी करणे योग्य आहे का? तर होय, परंतु पेरणीपूर्वी थायमिथॉग्जाम 30 एफएस मिली किंवा इमिडा क्लोप्रिड 48 एफएस 12 मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. तसेच उशिरा पेरलेल्या ज्वारीवर कोणत्या संभाव्य केली येऊ शकतात. तर ज्वारीची उशिराची पेरणी व ढगाळ वातावरणामुळे खोडमाशी खोड केळी व लष्करी आणि या किडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. त्यासाठी वरील प्रमाणे बीज प्रक्रिया तसेच नमोरिया रिलाई 40 ग्रॅम प्रति दहा लिटर किंवा थायमिथॉग्जाम 12.6 टक्के व लॅमडा सायहलोथ्रीन 9.5 टक्के मिली किंवा इमामेकटीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

हळद पिकासाठी 

हळद पिकावर पानावरील ठिपके आढळून आल्यास ऍझोक्झिस्ट्रॉबिन 18.2 टक्के अधिक डायफेनकोनझोल 11.4 एस.सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून स्टिकरसह फवारणी करावी. तसेच पिकांवर कंदसड आल्यास मेंटलक्सिल 4 टक्के अधिक मॅनकोझेब 64 टक्के 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळपिकांवरील उपाययोजना 

अवकाळी पावसामुळे ऊस लोळला आहे त्यासाठी 11 ते 12 महिन्याचा ऊस लोळला असल्यास लवकरात लवकर तोडणी करून कारखान्याला पाठवावे. फळपीके गारपिट व जोराचा वारा पाऊस यामुळे फळबागांच्या फांद्या तुटले आहेत. या तुटलेल्या फांद्या व्यवस्थित कापून त्या जागी बोर्ड पेस्ट लावणे. सद्यस्थितीत संत्रा मोसंबी लिंबू व पेरू या फळ पिकांमध्ये फळधारणा झालेली असल्यास एन एए 15 मिली अधिक 13:00:45 या खताची 150-200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा पिकांमध्ये भुरी रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक सल्फर 80 टक्के 40 ग्रॅम किंवा हेक्साकोनझोल 5 एससी 10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कांदा पीक 

कांदा पिकावर खरीप कांद्याची साठवून साठवणूक करावी का? तर खरीप कांद्याची साठवणूक न करता विक्री करावी. रब्बी कांदा रोपवाटिकेत आणि रांगडा कांद्याच्या पुनः लागवडीमध्ये कार्बेडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा हेक्साकोनझोल 5 एससी 10 मिली किंवा ऍझोक्झिस्ट्रॉबिन 18.2 टक्के अधिक डायफेनकोनझोल 11.4 एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

टोमॅटो, मिरची व वांगे या पिकांवर

टोमॅटो मिरची व वांगे या पिकांवर गारपीट व अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो का? तर तर होय सध्या परिस्थितीत कवडी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन कोझेब 75 टक्के किंवा क्लोरोथलोनिल 75 टक्के 25 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच गारपिटीमुळे खोड व फांद्यांना झाली असल्यास कॉपर हायड्रॉक्साइड 53.8% 15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वाटाणा पिकावर भुरी रोग येण्याची शक्यता

वाटाणा पिकावर भुरी रोग येण्याची शक्यता असून त्याकरता कार्बन-डेसीम 50 टक्के दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर पशुधन व चारा व्यवस्थापन करण्यासाठी सद्यस्थितीत ज्वारी व मका पिके घ्यावे. तसेच अचानक आलेला पावसामुळे सोयाबीनचा भुसा भिजला असल्यास तो सुकवून दोन टक्के मिठाची प्रक्रिया करून जनावरांना द्यावा.

टॅग्स :हवामाननाशिकपाऊसगारपीटपीक